शस्त्रपुजा – उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाकडून विजयादशमी निमित्त पुजा
फुले,विविध बंदूका व गोळ्यातुन साकारले भवानीचे रौद्र रूप
रावण दहन – कालिका माता देवी मंडळाचा नवरात्र उत्सव
उस्मानाबाद – समय सारथी
विजयादशमी निमित्त उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाच्या शस्त्रागारमध्ये पारंपरिक पद्धतीने शस्त्र पुजा करण्यात आली यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पुजा केली. पिवळ्या रंगासह विविध फुले, बंदूका, गोळ्या यांचा कल्पनात्मक वापर करुन भवानी देवीचे रूप साकारण्यात आले. तुळजाभवानी देवीचा फोटोची पुजा करण्यात आली तसेच यावेळी रायफल, पिस्टल, स्टेन गनसह विविध बंदूका व मॅकझीन व गोळ्यांचा वापर करीत सूर्याची व हिंदू प्रतीक चिन्ह असलेले स्वस्तिक साकरण्यात आले. शस्त्रसोबतच मोटार परिवहन विभागातील पोलिस दलातील वाहने यांचे पुजन करण्यात आले यावेळी पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते.
उस्मानाबाद पोलिस दलाने यावर्षी नवरात्र उत्सवात सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवत उत्तम कामगिरी केली असून सीसीटीव्ही,ड्रोन याससह अन्य बाबींचा प्रभावी वापर केला. पॉकेटमार, भिक्षुकरी यासह अवैध धंदे व प्रकारावर कारवाई केली. स्वतः पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे तुळजापूर येथे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमास हजyर राहत नियंत्रण व आढावा घेत होते शिवाय स्थानिक गुन्हे शाखा, दंगा नियंत्रण पथक असे अनेकजण पूर्णवेळ नवरात्र उत्सव पार पडण्याच्या मोहिमेवर होते. या नवरात्र बंदोबस्तात पोलिसांच्या राहण्याची, जेवणाची उत्तम सोय असल्याने इतर जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी समाधानी होते. कोजागिरी पौर्णिमेची तयारी पूर्ण झाली असून पोलिस विभाग सज्ज आहे.
रावण दहन – कालिका माता देवी मंडळाचा नवरात्र उत्सव
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील कालिका माता देवी येथे नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला यावेकी माता कालिका देवींची दर्शन आरती व रावण दहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दोघांनी सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी उपविभागीय अधिकारी कल्याण घेटे, पोलीस निरीक्षक उस्मान शेख ,पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, राखीव पोलीस निरीक्षक दुबे, नगर सेवक तथा आयोजक सचिन उर्फ राजाभाऊ पवार ,कोळेकर,बालाजी पवार,अरविंद गोरे, नगरसेवक सुजित ओहोळ, कालिका माता मित्र मंडळ पोलीस लाइन व जय भवानी गणेश मंडळ बँक कॉलनी,पोस्ट कॉलनी याचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.