धाराशिव – समय सारथी
ठेवीदारांची 1 कोटी 90 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका मल्टीस्टेट बँकेविरोधात धाराशिव जिल्ह्यातील कळंब पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन संचालक फरार आहेत. बीड येथील साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी यांनी ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची फसवणूक केली.
आरोपी नितीन जरिचंद भिसे, रा. सुर्डी, ता. केज जि. बीड, श्री. साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी, लि. बीड, शाखा कळंब शाखा अधिकारी, साधना शहीनाथ परभणे अध्यक्ष, श्रीराम सुर्यभान बोबडे उपाध्यक्ष,शाहीनाथ विक्रमराव परभणे, संचालक, सुभाष आप्पासाहेब उगले संचालक,लक्ष्मण विक्रमराव परभणे संचालक, सौ.अर्चना रविंद्र सुपेकर, संचालक,अर्जुन पंडीत कांबळे, संचालक, संजय पाटील बुवा सावंत संचालक, शिवाजी निवृत्ती खोड, संचालक, भगवान भानुदास काळे संचालक, विठ्ठल ज्ञानदेव जाधव संचालक, साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा कळंब येथील सर्व कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
2017 पासून ते 30 जुन 2024 या काळात आरोपींनी संगणमत करुन कट रचून फिर्यादी बाळासाहेब भुजंगराव कुपकर, वय 62 वर्षे, रा. सुर्डी, ता. केज जि. बीड व इतर ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमीष दाखवून आकर्षित करुन श्री. साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी, लि. बीड, शाखा कळंब शाखा येथे ठेवी ठेवण्यास सांगितले. सदर ठेवीची मुदत पुर्ण झाल्यानंतर ठेवीदार हे वारंवार ठेवीची रक्कम परत मिळणेबाबत शाखेत गेले असता त्यांना उडवाडवीचे उत्तरे दिली.
आरोपींनी सदरची शाखा बंद करुन निघून गेले यावरुन फिर्यादी व ठेवीदार यांची 1,90,53,690₹ (एक कोटी नव्वद लख त्रेपन्न हजार सहाशे नव्वद रुपयाची फसवणुक झाली आहे. अशी फिर्यादी बाळासाहेब कुपकर यांनी दिल्यावरून कळंब पो ठाणे येथे भ.दं.वि.सं. कलम 420, 409, 406, 120 ब सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.