धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्यास 130 उद्योजकांनी तयारी दर्शवली आहे. तुळजापुरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उद्योजक यांची बैठक घेतली त्यात टेक्सटाईलसाठी 80 तर गारमेंटसाठी 50 जण गुंतवणूक करण्यास तयार आहेत त्यामुळे आगामी काळात तामलवाडी एमआयडीसी टेक्सटाईल व गारमेंट हब बनणार आहे, यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
तामलवाडी तुळजापूर येथे 367 एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुषंगाने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लघु उद्योजकांची आमदार पाटील यांनी सोलापूर येथे बैठक आयोजित केली होती.सदर बैठकीत एमआयडीसीचे लातूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित उद्योजकांपैकी टेक्सटाईल साठी 80 तर गारमेंटसाठी 50 जणांनी गुंतवणूक करण्यास तयारी दर्शवली आहे.या प्रत्येक उद्योगाला 50 ते 100 कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती उपस्थित उद्योजकांनी दिली आहे ही बाब अत्यंत आनंदाची आहे.यातून 10 हजार रोजगार निर्मितीचे जे उद्दिष्ट ठेवलं आहे ते सहज साध्य होईल असा विश्वास वाटतो.यामुळे जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे असे आमदार पाटील म्हणाले.