धाराशिव – समय सारथी
सध्या तुळजापुर शहरात लॉजमालकांची फसवणुक करणारे रॅकेट सक्रीय झाले असुन मी यवतमाळवरून पोलीस निरीक्षक बोलतोय तुमच्या लॉजवर गैरकृत्य झाले आहे आणि त्याचा तपास आम्ही करीत आहोत, काही कारवाई, अटक व पोलीस केस होऊ द्यायची नसेल तर तात्काळ पैसे जमा करा व कारवाई थांबवू असे सांगत फसवणूक केली जात आहे. फोन करुन लॉज चालक यांना धमकाविले जात असुन त्यांच्याकडून 10-20 हजार रुपयांची रक्कम उकळली जात आहे. काही लॉजमालकांनी घाबरून त्या फेक पोलिसाच्या खात्यावर व फोन वर रक्कम पाठवली देखील आहे.
तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी राज्यभरातुन भाविक येत असतात त्यावेळी अनेक भाविक मुक्काम करतात त्याचा फायदा हा फसवणूक करणारा घेत असुन पोलीस निरीक्षक आहे असे सांगत पैसे लुटत आहे. बदनामी नको म्हणुन फसवणूक झालेले लॉजमालक पोलिसात तक्रार द्यायला घाबरत आहेत.
नवीन फसवणूकीचा प्रकार दिसतोय, नागरिकांनी पोलिसात तक्रार द्यावी, त्याचा तपास करू. चुकीच्या गोष्टी, दबावाला बळी पडून फसू नये असे आवाहन तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी केली आहे.