धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर येथील नृसिंह सहकारी साखर कारखाना विक्रीसाठी कोर्टाने स्थगिती दिली आहे. नृसिंह सहकारी साखर कारखाना हा सहकार कायद्यानुसार नोंदणी झालेला असुन हजारो शेतकरी याचे सभासद आहेत.
नृसिंह साखर कारखान्यावर अवसायक असून कारखान्याचे पूर्व संचालक मंडळाने अपेक्स बँक असलेल्या लीड बँकेकडून कर्ज घेतले होते. अपेक्स बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर ते कर्ज पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑप बँकेकडे वर्ग झाले. त्यानंतर पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे लायसन्स रद्द झाल्यांनतर ते एनपीए रेअर ऍसेट रिकंस्ट्रक्शन कपंनीने विकत घेतले. रेअर ऍसेट रिकंस्ट्रक्शन कपंनीने सदरील कारखाना विक्री करण्यासाठी 15 जून 2024 रोजी जाहीर नोटीस लोकसत्ता व इतर न्युज पेपर मध्ये प्रसिद्धी केली होती. सदरील विक्री नोटीसच्या नाराजीने कारखान्याचे सभासद दिनकर कल्याण गपाट याने जिल्हा न्यायालयात दावा दाखल करून कारखाना विक्रीस स्थगिती मागितली होती.
अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हा न्यायालयाने आदेश क्र. एमआयएससी/सिव्हिल अपील नंबर- 43/2024 दिनांक 29 जून 2024 रोजी रेअर ऍसेट रिकंस्ट्रक्शन कपंनी यांनी 15 जून 2024 रोजी विक्री काढलेली नोटिसी नुसार 03 जुलै 2024 रोजी होणार्या विक्रीस पुढील तारखेपर्यंत स्थगिती दिलेली आहे.
या पूर्वीही रेअर ऍसेट रिकंस्ट्रक्शन कपंनीने मे सीताराम साखर कारखाना लिमिटेड यांना 4 एप्रिल 2024 रोजी केलेला बेकायदेशीर भाडेतत्वावरचा करार डी.आर.टी. कोर्ट, छत्रपती संभाजीनगर यांनी आदेश क्र. 152/2024 हा 18 जून 2024 रोजी बेकायदेशीर भाडेतत्वावरचा करार रद्द केलेला आहे.