धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील माणकेश्वर येथील पुरातन महादेव मंदीर पुरात्तव विभाग जतन करणार असून त्याच्या जीर्णोद्धारसाठी 11 कोटी 58 लाखांची निविदा अंतीम टप्प्यात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी या कामाला निधी मिळाला यासाठी मागणी करीत पाठपुरावा केला होता त्यानंतर सरकारने तब्बल 11 कोटींचा निधी मंजुर केला त्यामुळे आता या मंदिराला पुरातन रूप येणार असून रुपडे बदलणार आहे.
संरक्षण हेरिटेज कन्सलटंट या दिल्ली येथील कंपनीने अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते त्यानंतर निधीची तरतूद करुन मान्यता देण्यात आली आहे. कामाची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
माणकेश्वर येथील पुरातन महादेव मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे, या हेमांडपंती मंदिराची मोठी दुरावस्था झाली असून जोत्याचा भाग खचला आहे तर छताला देखील गळती लागली आहे. याचे संवर्धन करण्यासाठी आता पुरातत्व विभागाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून करोडो रुपये खर्चून याला पूर्वीच रूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती सहायक संचालक जया वाहने यांनी दिली.