धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत 15 हजार रुपयांची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी यांना अटक केली आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणात ट्रॅकटर सोडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. प्रकाश नामदेव चाफेकर, पोलीस हवालदार येरमाळा पोलीस ठाणे व महेश जालिंदर सांगळे, चालक, पोलीस नाईक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर अशी आरोपींची नावे आहेत त्यांनी 15 हजार लाचेची मागणी केली व 15 हजार लाच घेताना रंगेहात अटक केली.
यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये जप्त असल्याने सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी चाफेकर यांनी सांगळे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे 15 हजार लाचेची मागणी करून 15 हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन तुळजापूर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी काम पाहिले त्यांना सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांचा समावेश होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.