उमरगा – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ढगफुटी झाली असून मोठा पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. तुफान पावसाने नदी नाल्याना पाणी आले असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, पेरणी केलेले शेत वाहून गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
उमरगा तालुक्यातील माडज, गुगळगाव, वागदरी, कोरेगाव, कोरेगाववाडीसह परिसरातील गावात ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस पडला आहे.मोठा पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून पेरणीसाठीचे बियाणे व खते सुद्धा भिजली आहेत.या पावसाचे पाणी माडज, गुगळगाव मार्गे कोरेगाव तलावात व नंतर उमरगा नदी मार्गे बेन्नीतुरा नदीत मिसळत कर्नाटक राज्यात जाते. सध्या शेतकरी यांनी सर्वत्र पेरणी केली आहे पण आताच्या ढगफुटीने शेतकरी यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.