धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे भाजपाची चिंतन बैठक सुरु असुन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे बैठक घेत आहेत, धाराशिव लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे व आगामी विधानसभा निवडणूक तयारी याचा आढावा ते घेत आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थितीत आहेत.
धाराशिव लोकसभा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आली होती तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पराभव झाला होता. ओमराजे निंबाळकर हे 3 लाख 30 हजार मतांनी विजयी होत सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांना औसा विधानसभा मतदार संघात 34 हजार 966, उमरगा 43 हजार 944, तुळजापूर 52 हजार 176, धाराशिव कळंब 60 हजार 423, परंडा सर्वाधिक 81 हजार 177, बार्शी 54 हजार 212 मतांची लीड मिळाली तर पोस्टल मतात 2 हजार 948 मतांची ओमराजे यांना आघाडी मिळाली आहे.