सुवर्णसंधी, गुंतवणुकीवर चांगला फायदा – ऊस उत्पादक शेतकरी नसला तरीही सिध्दीविनायक ग्रीनटेकचा शेअर्स घेता येणार – चेअरमन दत्ता कुलकर्णी
उस्मानाबाद – समय सारथी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच एखाद्या कारखान्याचा शेअर्स घेता येतो मात्र ऊस उत्पादक शेतकरी नसला तरी देखील गुंतवणूक म्हणून सिध्दीविनायक ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेडचा शेअर्स घेता येईल अशी महत्त्वाची घोषणा सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी खामसवाडी येथील शेतकरी संवाद मेळाव्यात केली. नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार असून गुंतवणूक करुन चांगला फायदा कमवता येऊ शकतो.
दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून सिध्दीविनायक ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याची उभारणी खामसवाडी येथे होत असून या अनुषंगाने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील,खामसवाडीचे सरपंच प्रभाकर शेळके, काँग्रेसचे नेते अशोक शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस प्रशिक्षण वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके, माजी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, दयानंद पाटील, अनिल शेळके, नितीन बंडगर, लक्ष्मण सिरसट, दिगंबर शेळके, नानासाहेब बाबर, भगवान झोरी, संजय राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना दत्ता कुलकर्णी म्हणाले की, खामसवाडी परिसरात सिध्दीविनायक परिवाराचा गुळ पावडर कारखाना होत असून या कारखान्याचा चाचणी हंगाम १९ फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने करण्याचा मानस आहे.यासोबतच ज्यांचा ऊस नसेल अशा शेतकऱ्यांसाठी देखील सिध्दीविनायक ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स घेता येणार असून यामध्ये प्रमोटर्स शेअर्स व सर्वसाधारण शेअर्स असे प्रकार केल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. तसेच प्रमोटर शेअर्स घेणाऱ्यांसाठी कमीत कमी दरवर्षी ८% टक्के लाभांश देणार असल्याची घोषणाही यावेळी दत्ता कुलकर्णी यांनी केली.
यावेळी संजय राजमाने,प्रा.सुशील शेळके,अमोल पाटील,संजय पाटील यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.प्रतिक देवळे यांनी केले तर प्रस्ताविक ॲड.नितीन भोसले यांनी केले या शेतकरी संवाद मेळाव्यास खामसवाडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा शेतकरी संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री सिध्दीविनायक परिवाराचे सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सिध्दीविनायक ग्रीनटेक प्रा.लि.आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास सर्वच पक्षातील नेत्यांची उपस्थिती होती यावेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी देखील सिध्दीविनायक परिवाराचे व दत्ता कुलकर्णी यांच्या कार्यशैलीचे कौतूक केले तसेच सर्वपक्षीय नेत्यांशी कसे संबंध ठेवावेत हे दत्ताभाऊ यांच्याकडून अन्य नेत्यांनी शिकण्यासारख असल्याचे ही सांगितले.