धाराशिव – समय सारथी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील शपथविधी सोहळ्याला अर्चना राणाजगजीतसिंह पाटील व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते त्यानुसार हे दोघेही राष्ट्रपती भवन येथे उपस्थितीत राहिले. नव्या भारताच्या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण आणि सद्भाग्य आहे. मोदी यांच्या विकसित भारताच्या निर्मितीमध्ये सदैव आम्ही आपल्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.जनसेवा हाच पाटील कुटुंबीयांचा श्वास आणि ध्यास आहे, ही सेवा अखंड चालू राहणार आहे. धाराशिवच्या शाश्वत विकासासाठी, प्रगतीसाठी अविरत प्रयत्नशील राहणार आहे असे त्या म्हणाल्या.
सुसंस्कृतता ही कर्तुत्वातून आणि कृतीतून दिसत असते म्हणूनच आम्हाला विकासासाठी मोदी हवे आहेत. विरोधकांकडून विकास सोडून धर्म आणि जातीचे राजकारण सुरू असताना पंतप्रधानांनी कृतीतून संविधानाला शिरोधार्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेत पाऊल ठेवल्यावर संविधानाला नमन करून पुढील कार्याची सुरुवात करणारे आजपर्यंतच्या इतिहासातील नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असावेत.
फक्त स्वार्थासाठी, राजकारणासाठी तत्वांचा संविधानाचा वापर विरोधकांना करता येतो मात्र कृतीतून अशी सुसंस्कृतता त्यांच्यात दिसत नाही, जी मोदी यांच्यामध्ये दिसते. संविधान हेच राष्ट्राचे सामर्थ्य आहे, या पदापर्यंत पोहोचविणारे राष्ट्राचे संविधान शिरोधार्य आहे, हे मोदी आपल्या विचारांमधून मांडत असतात अशी पोस्ट अर्चना पाटील यांनी केली आहे.