धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी 3 लाख 29 हजार 846 मतांनी विजय मिळवीत धाराशिव लोकसभेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचे नवीन रेकॉर्ड स्थापित केले.ओमराजे यांना सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदार संघात व सर्व 30 फेऱ्यात आघाडी मिळाली आहे. अर्चना पाटील यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली मात्र त्याची जादू चालली नाही. लोकसभा निवडणूकीत सर्व विधानसभामध्ये महाविकास आघाडीला विक्रमी लीड मिळाली त्यामुळे महायुतीच्या आमदार यांच्यासाठी विधानसभेला धोक्याची घंटा मानली जात आहे.
ओमराजे यांना औसा विधानसभा मतदार संघात 34 हजार 966, उमरगा 43 हजार 944, तुळजापूर 52 हजार 176, धाराशिव कळंब 60 हजार 423, परंडा सर्वाधिक 81 हजार 177, बार्शी 54 हजार 212 मतांची लीड मिळाली तर पोस्टल मतात 2 हजार 948 मतांची ओमराजे यांना आघाडी मिळाली. ओमराजे यांना 5,155 तर अर्चना पाटील यांना 2,207 मते पडली तर 1 हजार 391 अवैध मते पोस्टलमध्ये ठरली, सुशिक्षित लोकांकडून मतदान करताना मोठ्या चुका झाल्या.
पहिल्या फेरीत 12 हजार 566, दुसऱ्या फेरीत 13 हजार 903, तिसरी फेरीत 11 हजार 365, चौथी फेरीत 15 हजार 841, पाचवी फेरीत 9 हजार 479, सहावी फेरीत 14 हजार 164, सातवी फेरीत 10 हजार 394, आठवी फेरीत 12 हजार 7, नववी फेरीत 12 हजार 647, दहावी फेरीत 14 हजार 387, अकरावी फेरीत 13 हजार 358, बाराव्या फेरीत 11 हजार 656, तेराव्या फेरीत 13 हजार 467, चौदावी फेरीत 14 हजार 166, पंधरावी फेरीत 14 हजार 166, सोळावी फेरीत 11 हजार 824, सतरावी फेरीत 11 हजार 957, अठरावी फेरीत 16 हजार 733, एकोणीस फेरीत 11 हजार 728, वीसव्या फेरीत 11 हजार 261, एकेवीस फेरीत 10 हजार 954, बावीस फेरीत 9 हजार 751,तेवीसाव्या फेरीत 10 हजार 572, चोवीसव्या फेरीत 10 हजार 99, पंचेवीस फेरीत 8 हजार 752, 26 व्या फेरीत 8 हजार 510, 27 व्या फेरीत 5 हजार 45, 28 व्या फेरीत 3 हजार 889, 29 व्या फेरीत 2 हजार 55 व 30 व्या अखेरच्या फेरीत 260 मतांची लीड मिळाली.
धाराशिव लोकसभेतील 8 आमदार ( मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, अभिमन्यू पवार, राजाभाऊ राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज संस्था आमदार सुरेश अण्णा धस ) व इतर पक्षातून आलेले अनेक स्थानिक नेते, माजी आमदार हे महायुतीच्या बाजूने तर महाविकास आघाडीकडे धाराशिवचे एकमेव आमदार कैलास पाटील व इतर नेते होते. सर्व दिग्गज आमदार विरुद्ध ओमराजे निंबाळकर व महाविकास आघाडी अशी ही रंजक लढत अखेर एकतर्फी झाली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे निंबाळकर यांना 49.5 टक्के तर राणाजगजीतसिंह पाटील यांना 38.9 टक्के मते मिळाली होती.
2014 साली शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे डॉ पद्मसिंह पाटील यांचा 2 लाख 34 हजार मतांनी पराभव करीत रेकॉर्ड केले होते. गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 व डॉ पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मते मिळाली होती, त्यापूर्वी 1989 मध्ये भाराकॉ पक्षाचे अरविंद कांबळे हे 1 लाख 50 हजार मतांनी निवडून आले होते मात्र 1952 ते आजवरचे सर्व रेकॉर्ड ओमराजे यांनी मोडत नवीन विक्रम स्थापित केला आहे.