डॉक्टर होण्याचे स्वप्नभंग पावणार ? – उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया बंदी, पदवीत्तर प्रवेश घटवले
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयची प्रथम वर्ष 2022 यासाठी प्रवेश बंदी घातल्याने डॉक्टर होण्याचे अनेक विद्यार्थी यांचे स्वप्नभंग होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया बंदी केल्याने मोठे नुकसान होणार आहे.
अपुरा कर्मचारी वर्ग व महाविद्यालयात पायाभूत सुविधाची कमतरता असल्याने प्रवेश प्रक्रिया नाकारली आहे. राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती परिषदेने ही प्रवेश बंदी नाकारली आहे. उस्मानाबाद येथील महाविद्यालययातील 111 इतके BAMS प्रवेश होणार नसल्याने विद्यार्थीत नाराजीचा सुर आहे. उस्मानाबाद, मुंबई, जळगाव, नांदेड व नागपूर या 5 आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे यावर्षीचे प्रवेश होणार नाहीत. प्रवेश प्रक्रियेला मान्यता द्यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना लेखी पत्र दिले आहे.पदवीत्तर प्रवेश क्षमता ४८ वरून २३ इतकी झालेली आहे.
सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रिये दरम्यान शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची कमतरता या निकषांवर आधारित राज्यातील पाच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश प्रक्रियाची परवानगी नाकारल्याचे ‘राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती परिषद’ (National Commission for Indian System of Medicine-NCISM) यांनी कळविले आहे.
उस्मानाबाद महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची १५ पदे मंजूर आहेत. त्यातील ७ पदे भरलेली असून ८ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांची १६ पदे मंजूर आहेत. त्यातील ६ पदे भरलेली असून १० पदे रिक्त आहेत. अधिव्याख्याताची २८ पदे मंजूर आहेतत्यातील १६ पदे भरलेली असून १२ पदे रिक्त आहेत. यासोबतच वर्ग-३ ची ३६ पदे मंजूर आहेत त्यातील २३ पदे भरलेली असून १३ पदे रिक्त आहेत. वर्ग-४ ची २५ पदे मंजूर आहेत. त्यातील १८ पदे भरलेली असून ७ पदे रिक्त आहेत.
कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक म्हविद्यालयात वाढती रुग्णसंख्या, उपचार, यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. आजही शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अफाट आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबाद येथील पदवी प्रवेश क्षमता ६३ असून पदवीत्तर प्रवेश क्षमता ४८ अशी एकूण १११ प्रवेश क्षमता आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे चालू वर्षी प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश प्रक्रियाची नाकारली असून पदवीत्तर प्रवेश क्षमता ४८ वरून २३ इतकी झालेली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने अद्यापपर्यंत त्रुटींची पूर्तता केलेली नाही त्यामुळे पूर्तता करुन प्रवेश प्रक्रिया पूर्ववत सुरु करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.