धाराशिव – समय सारथी
महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना सायबर पोलीस विभागाने क्लीन चीट दिली आहे. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन गर्दी जमावल्याची लेखी तक्रार शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 4-5 व्हिडिओ सोबत जोडून केली होती.
ओमराजे यांनी तक्रारी सोबत दाखल केलेले ते व्हिडिओ खोटे अर्थात इडिटेड असल्याचे सायबर अहवालात समोर आले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी या व्हिडिओची सत्यता तपासणीचे आदेश सायबर विभागाला दिले होते त्यावर सायबर पोलिसांनी लेखी अहवाल दिल्याचे सूत्रांची माहिती आहे. ओमराजे निंबाळकर यांनी सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याची तक्रार केली होती त्यासाठी त्यांनी 4 व्हिडिओ निवडणुक आयोगाला दिले होते त्याच्या तांत्रिक तपासणीत हे व्हिडिओ खोटे असल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओतील संबंधीत लोकांचे जबाब नोंदविण्याची शिफारस सायबर अहवालात करण्यात आली असुन व्हिडिओ मधील भाषा स्क्रिपटेड व बॅकग्राउंड ब्लर असल्याने लोकेशन सांगणे कठीण असल्याचा अहवाल म्हण्टले आहे, एकंदरीत अनेक गोष्टीवर संशय व प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.