बहीण अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करुन उभा राहणार
धाराशिव – समय सारथी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची पुणे येथे निवासस्थानी भेट घेतली. पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यावर पवारांचे सावंत कुटुंबियांच्या वतीने स्वागत आणि सत्कार केला.
ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची नाराजी काढण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. मंत्री तानाजीराव सावंत यांनी धाराशिव येथील प्रचार सभेत अजित पवार समोर बोलून शिवसैनिकांची खदखद व नाराजी बोलून दाखवली होती.
सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी शिवसेनाकडुन उमेदवारी मागितली होती मात्र जागा राष्ट्रवादीला जाऊन न मिळाल्याने सावंत नाराज होते. मंत्री सावंत यांनी उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता धाराशिव येथील तेरणा साखर कारखान्यावर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा, बैठक बोलावली आहे.
प्रचार रॅलीत अजित पवार यांच्या समोर मंत्री सावंत म्हणाले होते की, खरं तर त्या गोष्टीला वेळ आहे पण परखड बोलतो, 26 जानेवारीला महयुतीचा धनंजय सावंत यांनी प्रचार सुरु केला आहे. हा मतदार कडवट शिवसैनिक यांचा आहे, तो बाणा तो कधीही सोडणार नाही तरी सुद्धा आमच्या मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री यांनी ठरवले की मतदार संघ महायुतीत राष्ट्रवादी घड्याळला सोडायचा. ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपिठावर येऊ त्यावेळी समोरच्याच्या फडशा पडल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारे शिवसेनेचा एक एक मतदार संघ कमी होत राहिला तर शिवसैनिक व मी स्वतः सहन करणार नाही असे म्हणाले होते.
धाराशिव मतदार संघ शिवसेनेचा आहे, शिवसेनाचा खासदार जास्त वेळेस गेलेला आहे एक वेळ राष्ट्रवादीचा खासदार निवडून गेला आहे. आम्हा शिवसैनिक यांच्यावर हा अन्याय आहे मात्र अबकी बार 400 पार असा नारा आहे, विश्व् नेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपले दुःख विसरून शिवसैनिक यांना मानाचा मुजरा व विनंती करतो की अर्चना पाटील यांना निवडून द्या. बहिण अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करुन उभा राहील असे मंत्री सावंत म्हणाले होते.