धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाने धाराशिव लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असुन 1 हजार उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. कारी या गावातील अमोल जाधव या तरुणाने स्वतःचे सोयाबीन तारण ठेवून 1 लाख रक्कम कर्ज घेतली आहे. अमोल जाधव हा स्वतःचा आई वडील व पत्नी असे 4 उमेदवारी अर्ज लोकसभेला भरणार आहे. जाधव याने साडे तीन टन सोयाबीन शासकीय गोदामात तारण ठेवले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण मागणीसाठी समाज आक्रमक झाला आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील भुम,वाशी,परंडा, उमरगा, लोहारा,तुळजापूर, कळंब, धाराशिव व बार्शी आणि औसा या 10 तालुक्यात बैठका झाल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असुन बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत त्यामुळे 1 हजार उमेदवार उभे केले जाणार आहेत. मराठा समाजाने निवडणुकीसाठी विविध समन्व्य समित्याचे गठन करण्यात आले. प्रत्येक गावातून एक उमेदवार मराठा समाजाच्या वतीने अर्ज भरणार असल्याचे यात ठरले.
384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात त्यात एका ईव्हीएम मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार बसू शकतात त्यानंतर अधिक उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागते. एका अपक्ष उमेदवार याला अर्ज भरण्यासाठी ओपन खुल्या गटातून 25 हजार डिपॉझिट अनामत रक्कम व इतर गटातून 12 हजार 500 रुपये लागतात तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना 10 मतदार सुचक म्हणून लागतात.