दिल्ली – समय सारथी
18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन देशात आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे. देशात 543 मतदार संघात 7 टप्प्यात निवडणुका होणार असुन 4 जुन ला मतमोजणी होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, 3 रा टप्पा 7 मे, 4 था टप्पा 13 मे , 5 वा टप्पा 20 मे , 6 वा टप्पा , 7 वा टप्पा 1 जुन रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13, 20 मे असे मतदान होणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान होणार असुन मतमोजणी 4 जुन या दिवशी होणार आहे. 12 एप्रिल रोजी अधिसूचना, 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असेल. 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी वापस घेता येईल, मुख्य निवडणुक आयुक्तानी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. निवडणुक आयोग निवडणुकीसाठी सज्ज असुन सर्व तयारी करण्यात आली आहे. ईव्हीएम पद्धतीने निवडणुका होतील.
19 एप्रिल – गडचिरोली, भंडारा – गोंदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर
26 एप्रिल – यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड
7 मे – उस्मानाबाद, रायगड, बारामती, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकानगले
13 मे – नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड
20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई येथील सर्व 6 मतदार संघ
16 जुनला लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. 97 कोटीहुन अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतील. 1 कोटी 82 लाख नवं मतदार मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावतील तर अडीच लाख मतदार हे 100 वर्षापेक्षा जास्त आहेत, 47.1 कोटी महिला मतदार असुन पुरुष मतदार 49.7 कोटी, 48 हजार तृतीयपंथी मतदार देशात आहेत, हे सर्व देशाचे राजकीय भविष्य ठरवितील. 12 राज्यात महिला मतदाराची संख्या जास्त आहे. 55 लाख पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन असणार आहेत.
उन्हापासुन त्रास होऊ नये म्हणून सर्व सुविधा व छत टाकले जाणार आहे. यावेळी 85 वर्ष पेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरी बसून मतदार करता येणार आहे. उमेदवार यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती वृत्तपत्रात द्यावी लागणार आहे.
अद्याप महायुतीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नसुन महाविकास आघाडीकडुन विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे. महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.