मुंबई – समय सारथी
मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशीचे विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिले आहेत.चौकशीचे आदेश दिल्याने अनेक जण रडारवर असुन त्यांच्या अडचणीत वाढ येऊ शकते. आंदोलनात झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्यात येत असुन त्यानुसार ती वसुली व इतर कारवाईच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
आमदार प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांनी याबाबत मागणी केली होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच आमरण उपोषण मागे घेतले असुन 2 दिवस उपचारानंतर ते पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.
जरांगे यांच्या सभेचा, आंदोलनाचा खर्च कोण केला, षडयंत्र कोणी रचले, राजेश टोपे यांच्या कारखानावर षडयंत्र रचले गेले, शरद पवार यांचे फोन येत होते. ईडी चौकशी व जरांगे यांची नार्को चाचणी करावी व जरांगे यांना अटक करावी अशी मागणी दरेकर यांनी केली.