शिवराळ व शेळक्या भाषेत कानटोचत घेतला समाचार – गद्दार, मराठाद्रोहीची उपमा, गावबंदीचा दिला इशारा
धाराशिव – समय सारथी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करताना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोचरी टीका करीत फेसबुक लाईव्ह करुन त्यांचा निषेध केला. लाईव्हनंतर मराठा समाज आमदार राणा यांच्या विरोधात आक्रमक झाला असुन इतके दिवस कुठे होतात, आताच का बोलायचं सुचलं असा प्रश्न केला आहे. शिवराळ व शेळक्या भाषेत मराठा समाजाच्या आंदोलकांनी कानटोचत आमदार राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दार, मराठा द्रोहीची उपमा देत मराठा विरोधी आमदाराला गावबंदी केली पाहिजे असा इशारा दिला. आमदारांच्या लाईव्हवर टिकेच्या पोस्टचा भडीमार झाला त्यानंतर त्यांनी कॉमेंट्स बंद केल्या.
समाजापेक्षा पक्ष प्रेम उफाळून येत, समाजाच्या बाजूनं बोलणं होत नसेल तर गप्प बसा. कमीत कमी विरोधात तरी बोलू नका.समाजापेक्षा देवेंद्र जवळचा. लाचार, खरे रूप आले बाहेर. ज्याला ज्याला वाटतं की आजचा काळा दिवस आहे त्यांना एवढेच सांगायचे 16 दिवस उपोषण करूनही समाजासाठी इतक्या ताकतीने आज माणूस उठलाय त्यामुळे सकल मराठा समाजाचा आजचा दिवस प्रकाशमान झाला असं मला वाटतेय अश्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
मराठ्यांशी गद्दारी केली,लाठीचार्जवर बोलायला लाज वाटली. जरांगे पाटलांचा निषेध करताना समाजापेक्षा ते जवळचे वाटले. मराठ्यांशी गद्दारी महागात पडणार. काळा दिवस हा समाजासाठी नसून समाजा विरुद्ध गरळ ओकणाऱ्या आमदार खासदारांसाठी आहे. लाचारवीर, भावपूर्ण श्रद्धांजली.सगळेच आमदार खासदार दळभद्री, मराठाद्रोही आहेत.ईडीच्या भीतीने बोलला, आजपर्यंत नाही बोलला. जो पवारांचा, पक्षाचा झाला नाही तो समाजाचा काय होणार ? कशासाठी मंत्रीपदासाठी उठाठेव, फेसबुक पिंट्या अशी टीका केली गेली आहे.
आता कस कराव ? आपलेच दात आपलेच ओठ ! मराठा आमदार खासदारांनी तरी मराठा जातीसाठी विरोध करण्यापेक्षा शांत तरी रहावे. सत्तेसाठी बाप बदलणाऱ्यांनी मराठ्यांना विषयी बोलू नये.तुझ भागलं की झाल का? तुला बगू आता निवडणूक. निलेश राणेची भाषा आवडते का ? मराठ्याने मराठ्याला साथ द्यावी.
गद्दार मराठा आमदारांचा जाहीर निषेध. कोणते गाजर दाखवले म्हणून बोलत आहेत. संयमाला मर्यादा असावी अशी टीका करीत आमच्या समर्थनार्थ नसेल तर किमान विरोधात बोलु नका, शांत राहण्याचा सल्ला समाजाने दिला.