भुम – समय सारथी
भूम येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार व पाठपुराव्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे. डायलिसिससाठी भुम येथील रुग्णांना बार्शी,सोलापूर,धाराशिव,बीड, नगरसह अन्य ठिकाणी जावे लागत होते त्यासाठी दिवसभर ताटकळत राहत वेळ व पैसे खर्च होत होते मात्र आता रुग्णांची सोय होणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही मशीन सुरु होऊन रुग्णांवर उपचार करण्यात येतील.
मंत्री सावंत यांनी भुम येथील कार्यक्रमात संयोगीता गाढवे यांना जाहीर कार्यक्रमात शब्द दिला होता की, तुमच्या मागणीप्रमाणे एक भाऊ म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून 1 महिन्याच्या आत डायलीसिस मशीन भूमला देणार तसेच मार्च अखेर सीटी स्कॅन मशीन देणार. त्यानुसार डायलिसीस मशीन उपलब्ध झाली असुन आता लवकरच सिटी स्कॅन मशीन सुद्धा मिळणार आहे त्यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
भुम शहरात उपजिल्हा रुग्णालय व स्वतंत्र महिला रुग्णालय आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिले त्याबद्दल संयोगिता गाढवे यांनी आभार मानले, मंत्री सावंत हे पालक म्हणून न मागता देतात. दूरदृष्टी असल्याने ते विकासाचे निर्णय पटकन घेतात. शहरात सोनोग्राफी व डायलीसिस मशीन द्यावी अशी मागणी करीत त्यांनी भुम नगर परिषद येथील नागरी सत्कार कार्यक्रमात केली होती तसेच भुम नगर परिषद राज्यात प्रथम आनण्याचा संकल्प गाढवे यांनी व्यक्त केला होता.
आरोग्य मंत्री सावंत यांच्यामुळे भूम परंडा वाशी या मतदारसंघात रुग्ण व्यवस्थेला बळकटी आली असून रुग्णालयाचे श्रेणीवर्धन त्याचबरोबर नवीन मान्यता ही मिळाली आहे. आरोग्याच्या बाबतीत न भूतो न भविष्यती काम झाले असून श्रेणीवर्धन व सर्व व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर या भागातील आरोग्याचे चित्र वेगळे असणार आहे.