भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले
फेसबुक लाईव्ह करीत केले मराठा समाजाला आवाहन, शांत डोक्याने विचार करा
धाराशिव – समय सारथी
आजचा दिवस खरोखरच काळा व दुर्दैवी दिवस असुन जरांगे यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत त्यामुळे त्याचा निषेध करीत जरांगे यांनी संयम व मर्यादा पाळाव्यात असा सल्ला भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करुन दिला आहे शिवाय जरांगे यांचा केला बोलविता धनी वेगळा असल्याचा आरोप करीत मराठा समाजाला शांत व संयमाने राहण्याचे आवाहन केले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील मैदानात उतरले असुन त्यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे.
दिवसभरात हे घडले त्यामुळे काळा दिवस आहे, गरजवंत मराठासाठी लढणारा नेता ज्याप्रकारे बोलले ते दुर्दैवी असुन सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत जे बोलले असे सांगत आमदार राणा यांनी जरांगे यांचा निषेध केला. महाराष्ट्रात वेगळी संस्कृती असुन त्यात आपण वाढलो आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, जेव्हा राजकारण समाजकारणात असतो त्यावेळी प्रचंड संयम बाळगावा लागतो, मर्यादा पाळाव्या लागतात मात्र ज्या प्रकारे जरांगे बोलले ते अत्यंत दुर्दैवी निंदनिय होते.
देवेंद्र फडणवीस यांनी जे मराठा समाजासाठी केलेले काम आहे, ते सर्वांना माहिती आहे.. आरक्षण दिले, सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळ हे सगळे माहिती आहे मात्र हे सगळे बाजूला ठेवून जी भाषा वापरली गेली ती आपल्याला योग्य वाटते का ? असा प्रश्न समाजाला केला. मला तर प्रामाणिकपपणे वाटते की सगळे लोक पाहत असतात. सर्व मराठा समाजाने आपल्या इतिहासकडे बघा. आपण महत्वाचा लढा नियोजनबद्ध संयमाने लढणे गरजेचे आहे. आताच्या सरकारने न्याय दिला हे आपण मान्य करा.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आरक्षण टिकेल, सर्व त्रुटी दूर केल्यात. अगोदर आंदोलनाचे स्वरूप वेगळे निस्वार्थी होते मात्र आता बाजूला जाऊन बोलावता धनी वेगळा आहे अशी भावना समोर येत आहे. माझी सर्व संबंधित यांना विनंती आहे की, आपण संयम, तारतम्य बाळगावे. शब्द वापरताना कसे व्यक्त होतो याचा गांभीर्याने विचार करा, व्यथित होणारा प्रकार असुन शांत डोक्याने विचार करावा असे आवाहन आमदार राणा यांनी केले आहे.