धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 पासून महिलांमध्ये कर्करोग तपासणीकरीता मोबाईल वैद्यकीय युनिट सुरु करण्यात आले होते. यामध्ये 30 वर्षावरील सर्व महिलांची तपासणी करण्यात आली.यामध्ये मधुमेह,उच्च रक्तदाब व तीन प्रकारचे कर्करोग तसेच हिमोग्लोबीन तपासणी शोध मोहिम राबविण्यात आली त्यात काही संशयित रुग्ण सापडले असुन त्याची पुढील तपासणी व वैद्यकीय उपचार सुरु आहेत. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे स्वतः या मोहिमेकडे लक्ष देत असुन महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री सावंत यांनी केले आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी मोबाईल वैद्यकीय युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले व सर्व नागरीकांनी या तपासणीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन त्यावेळी पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांनी केले.
धाराशिव जिल्ह्यात पहिला टप्पा 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविण्यात आला.यात 1 लाख 25 हजार 449 महिलांची एच बी तपासणी व कर्करोग तपासणी करण्यात आली. यामध्ये अति तीव्र ॲनिमियाचे 322 रुग्ण सापडले. त्यांना आयर्न सुक्रोज इंजेक्शन आणि आयर्न फॉलिक ॲसीड गोळ्या सुरु करण्यात आली तसेच गर्भाशय मुख कर्करोग संशयीत 366 महिलांची पॅप स्मिअर घेण्यात आला असता 65 रिपीट पॅप स्मिअर घेण्यात आले असता आणि 2 कन्फर्म गर्भाशय मुख कर्क रुग्ण सापडले.2 कन्फर्म रुग्णांना बार्शी नरगीस दत्त कर्क रुग्णालय येथे उपचार सुरु करण्यात आले आहे. या टप्प्यातील 65 महिलांना रिपीट पॅप स्मिअर सांगण्यात आले होते तरी स्मिअर शासकीय मेडिकल कॉलेज,धाराशिव येथे करणे सुरू आहे.
15 ऑक्टोबर 2023 पासून मिशन आनंदी दुसरा टप्पा अंतर्गत संशयीत रुग्णांची तपासणी सुरु केली आहे.गर्भाशय मुख कर्करोग संशयीत 2 हजार 333 पैकी 18 संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली.ग्रामीण रुग्णालय भूम-5, ग्रामीण रुग्णालय लोहारा – 5, ग्रामीण रुग्णालय वाशी-8, स्तन कर्क रोग क्लिनिकल एक्झामिनिशन ग्रामीण रुग्णालय भूम – ४ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 504 संशयीत रुग्ण आढळले.त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय येथे कॅम्पमध्ये तपासणीकरीता बोलवणार आहे.त्यानुसार भूम ग्रामीण रुग्णालय, परंडा ग्रामीण रुग्णालय,कळंब उपजिल्हा रुग्णालय,तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय,लोहारा ग्रामीण रुग्णालय,वाशी ग्रामीण रुग्णालय व उमरगा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात महिलामध्ये कर्करोग तपासणीकरीता मोबाईल वैद्यकीय युनिट हे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी महिलांची कर्करोग तपासणी करुन रोगनिदान करुन टाळता येण्याजोगा आणि उपचार करण्यास योग्य तसेच कॅन्सरमुळे होणारा मृत्यू आणि खिशातून होणारा खर्च कमी होईल असे सांगितले.तसेच जिल्ह्यातील महिलांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला उच्च स्तरावरील निदान साधने उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी कळविले आहे.