धाराशिव – समय सारथी
मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी आजपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरु होत असुन चलो धाराशिव, मी जातोय तुम्ही पण या असा नारा देत आवाहन केले आहे. 20 फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजता धाराशिवमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार असुन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
एक मराठा लाख मराठा असं म्हणत गरजवंत मराठ्याचा लढा, शेवटचा शांतता मोर्चा छञपती शिवाजी महाराज चौक,धाराशिव येथे होणार असल्याचे सकल मराठा समाजाने जाहीर केले असुन आगामी काळात आक्रमक आंदोलन करण्याचा जणू इशाराच दिला आहे. आज विधानससभा व विधानपरिषदेचे एक दिवशीय विशेष अधिवेशन असुन त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाची दिशा व भुमिका स्पष्ट करणार आहेत.
गेल्या 4 दिवसापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम व दिवस रात्र ठिय्या आंदोलन करण्यात येत होते मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती असल्याने आंदोलनाचे स्वरूप थोडेसे बदलत मराठा आंदोलकांनी एका बाजूला आंदोलन सुरू ठेवले होते मात्र आता चक्काजाम व ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.