धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे तलाठी भरती घोटाळ्याचे रॅकेट उघड झाले असुन या प्रकरणी 4 जणांवर आनंद नगर येथील पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असुन याचे लातूर कनेक्शन उघड झाले आहे. लातूर येथील मयुर दराडे, प्रमोद केंद्रे, सचिन मुंडे, राजू कांबळे अशी या चार जणांवर कलम 420,419,468,379 व माहिती तंत्रज्ञान कलम 66 नुसार गुन्हा नोंद झाला आहे. यात 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक रवी सानप करीत आहेत.
संगणक हॅक करुन तलाठी भरतीचा ऑनलाईन पेपर सोडावीला गेला, याप्रकरणी चौकशी केल्यानंतर हा घोटाळा समोर आला असुन पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट 23 ते 14 सप्टेंबर 2023 या काळात परीक्षा झाली त्याचा निकाल 24 जानेवारी 2024 ला लागला त्यात 2 जणांनी इतरांच्या मदतीने घोटाळा केला असे प्राथमिक चौकशीत पुढे आले होते.
ऑनलाईन संगणक हॅक करुन पेपर सोडविण्यात आला, घोटाळा घालण्यासाठी नवीन पद्धत अवलंभन्याय आली, 2 परीक्षार्थी यांनी पेपर सोडवताना उत्तरे सोडविली नाहीत, त्यानंतर एक माउस कर्सर जिथे येईल त्याला टीक केले अश्या पद्धतीने घोटाळा घालण्यात आला.
35 लाख दिले तर तलाठी पेपर पास करण्याची सेटिंग करेल असे लातूर येथील एकाने सांगितले त्यानंतर 2 परीक्षार्थी यांनी प्रत्येकी 27 लाख देतो असे सांगितल्यावर हॅकिंग करण्याचे ठरले. लातूर येथील एका सेंटर चालकाने याची योजना तयार केली व ऑनलाईन पेपर सोडवून दिला. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच अश्या प्रकारचा ऑनलाईन पेपर घोटाळा उघड झाला आहे.