घरचा आहेर – मधुकरराव चव्हाण यांच्या काळातील कामे आमदार राणा दाखवीत सत्कार करुन घेतात
धाराशिव – समय सारथी
मी लोकसभा उमेदवारीचा दावेदार आहे, भाजपात घराणेशाही चालत नाही असे सांगत भाजपचे नेते सुधीर पाटील यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या काळात तुळजापुर येथे झालेली कृष्णा खोऱ्याची व सिंचनाची कामे आमदार राणा दाखवतात हे दुर्दैवी आहे असे सांगत घरचा आहेर दिला.
पत्रकार परिषदेत सुधीर पाटील म्हणाले की सत्तेत व विरोधात पण तेच आहेत त्यामुळे गेली 25 वर्षांपासुन जिल्ह्यात घराणेशाही सूरी आहे. मी 2019 पासुन लोकसभा तयारी करीत आहे, तुळजापूर विधानसभा लढवली आहे. 1989 पासुन राजकारणात सक्रीय व निवडणुक लढवली. डॉ पद्मसिंह पाटील विरोधात त्यावेळी कोणी विरोधात उभरायला तयार नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पद्मसिंह पाटील विरोधात निवडणुक लढविली व लढा देत संघर्ष केला, तेव्हापासून आजवर शिवसेना व नंतर भाजप मध्ये काम करीत आहेत. मी भाजपचे पूर्णवेळ काम काम करीत आहे. 2019 ला युती झाली त्यामुळे केलेली तयारी थांबावली व शिवसेना भाजप युतीचे काम केले व ओमराजे यांना निवडणून दिले.
पाटील पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये मी खरा दावेदार आहे, लोकसभा मतदार संघात काम केले आहे. लोकांच्या थेट संपर्कात आहे, 2014 भाजपचा खरा दावेदार असुन पक्ष व केंद्रीय राज्य समितीकडे मागणी केली आहे, कामकाज अहवाल दिला आहे. शिंदे यांचा दावा योग्य आहे मात्र आम्ही भाजप म्हणून सक्षम आहोत. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी मी भाजप व पर्यायाने महायुतीचे काम करणार असे सांगत त्यांनी पुढची राजकीय भुमिका स्पष्ट केली.
भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही, आमदार राणा पाटील हे पुर्वी ज्या पक्षात काम करीत होते तिथे हे चालायचे आता नाही, इथे काम पाहिले जाते, कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही काम करणार. मी विमा आणला, 5000 कोटी आणले, याचे भांडवल नको, आमदार असल्याने पैसे येतातच.निधी आणला या वादामुळे विकास कामे थांबली असा आरोप केला.
आमदार राणा पाटील हे जे सध्या कृष्णा खोरे व सिंचनाचे काम दाखवीत आहेत ते काम माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केली असुन त्यांच नाव घेण्याऐवजी राणा हे स्वतः आपण काम केले आहेत असे सांगत आहेत हे चुकीचे आहे. पद्मसिंह पाटील हे 10 वर्ष पाठबंधारे मंत्री होते त्या काळात सर्व सिंचन कामे व्हायला हवी होती मात्र ती झाली नाहीत हे दुर्दैव आहे असे सुधीर पाटील म्हणाले.