भाजपने उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले – केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बैठका सुरु
उस्मानाबाद – समय सारथी
भारतीय जनता पार्टीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारी सुरु करीत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्मानाबाद लोकसभेचीची जबाबदारी टाकली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात या दौऱ्यात विविध स्तरावरील बैठका व कार्यक्रम होणार आहेत. भाजपने लोकसभेसाठी पुर्ण शक्ती लावली असून दोन केंद्रीय राज्यमंत्री मैदानात उतरवले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यावर सुद्धा उस्मानाबादला मागास जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी जबाबदारी टाकली आहे.
मिश्रा हे लोकसभा मतदार संघातील बूथ प्रमुख बैठक, कोअर कमिटी आढावा बैठक घेणार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा ठोकत तयारी सुरु केल्याने शिंदे गटात अस्वस्था आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर निवडणूक आले असून भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आजच्या बैठकीना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, अभिमन्यू पवार, जिल्हा अध्यक्ष नितीन काळे,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिहा राजे निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
भाजप शिवसेना युतीच्या वेळी 2019 मध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ हा शिवसेनाकडे म्हणजे ठाकरे यांच्याकडे होता मात्र आता शिवसेनेत ठाकरे व शिंदे हे 2 गट पडल्याने शिंदे गटाने उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काल उस्मानाबाद परभणी या लोकसभा जागा शिंदे गटाला हव्या आहेत असे सांगत दावा ठोकला होता. मराठवाड्या मधील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या लोकसभेच्या जागा आमच्या असून या लोकसभेच्या जागा शिंदे गट लढवणार असे अर्जुन खोतकर म्हणाले होते.
भाजपा मराठवाड्यातील आठही जागा भाजपा लढवणार असे भाजपा नेत्यांकडून वक्तव्य होत असताना शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. भाजप नेते करत असलेल्या वक्तव्याचा फार गंभीर घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे परंतु भाजप आणि शिंदे गट एकत्र असताना असे वक्तव्य करतांना, भाजप नेत्यांनी भान ठेवले पाहिजे कारण आशा वक्तव्यामुळे कार्यकर्त्यामध्ये चलबिचल होऊ शकते असेही खोतकर म्हणाले आहेत.