धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण अंमलबजाबवणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषनाच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्हा बंदला उर्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. धाराशिव,तुळजापूर, उमरगा,भुम,परंडा, वाशी येथे तालुका व शहर बंदला प्रतिसाद मिळाला आहे.
एकीकडे बंद सुरु असतानाच धाराशिव येथील 2 तरुणांचे 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 2 तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असुन आज उपोषणाचा 3 रा दिवस आहे. जरांगे यांची मागणी मान्य करावी तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार केला.
मराठा आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी तुळजापूर शहर कडकडीत बंद करण्यात आला असुन तुळजाभवानी मंदीर परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. व्यापारी, स्थानिक नागरिक यात सहभागी झाल्याने बंद यशस्वी झाला आहे.
धाराशिव शहरात तरुण आक्रमक होत रस्त्यावर उतरला असुन मोटार सायकल रॅली काढली आहे. सरकारला 3 तासाचा अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवत असल्याने धाराशिव येथील तरुणांनी रस्त्यावर उतरत शहरातून रॅली काढली व शहर बंद केले. येत्या 3 तासात सरकारने निर्णय न घेतल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे.