धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली असुन सर्व दुकानें, व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. सकाळी 9 वाजता धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा बांधव जमणार आहेत तिथून एक रॅली काढण्यात येईल. हा बंद शांततेत असणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 4 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे म्हणून त्यांच्या समर्थनार्थ व सरकारने मागण्या मान्य कराव्यात म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंदला पाठिंबा म्हणून धाराशिव जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाने दिली आहे, तरी नागरिकांनी याला पाठिंबा देत सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. संकेत सूर्यवंशी, अक्षय नाईकवाडी, निलेश साळुंके यांनी एक पत्रक याबाबत काढत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
रुग्णालय, औषध दुकाने व इतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहतील त्याच्यावर बंदचा कोणताही परिणाम असणार नाही.