धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ढोकी येथील तेरणा कारखान्यावर एका कार्यक्रमात भेट घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल आभार मानत मागण्याचे निवेदन दिले. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची भेट घडवून आणली यावेळी बलराज रणदिवे,ऍड धैर्यशील सस्ते,संकेत सूर्यवंशी,निलेश साळुंखे,अक्षय नाईकवाडी,अमर देशमुख,सयाजी शेळके,अभिजीत देशमुख,खंडू राऊत,संताजी सूर्यवंशी,निलेश कदम यांच्यासह समाज बांधव उपस्थितीत होते.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल धाराशिवेतील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले तसेच संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी केली. आंदोलक यांच्यावरील गुन्हेगार मागे घेण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला होता मात्र अद्यापपर्यंत मराठा आंदोलन वरील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत त्यात वैयक्तिक लक्ष घालून गुणी मागे घ्यावे अशी मागणी केली.
अनेक शासकीय इमारती व शासकीय जागा पडून असून त्याचा कोणताही वापर नाही त्या ठिकाणी व तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजासाठी स्वतंत्र वस्तीग्रह तात्काळ बांधून द्यावीत. मराठा समाजासाठी मराठा भवन बांधण्यात यावे सकल मराठा समाजाने केली.
मराठा समाजाने मोठे केले, संधी असताना आरक्षण दिले नाही याची खंत
कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते ते दिले जात आहेत.ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्याना कायद्याच्या चौकटीत बसणारे टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.ओबीसी धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाने अनेक लोकांना मोठे केले सत्ता दिली मात्र संधी असताना त्यांनी आरक्षण न देता वंचित ठेवले हे दुर्दैवी आहे याची मला खंत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी दिले नाही म्हणून मी आरक्षण दिले, आम्ही जो शब्द देतो तो पाळतो.समाजाला न्याय देण्याचे सरकारचे काम आहे असे ते म्हणाले.