मानाचा तुरा – प्रा नितीन कुंभार यांना पुणे विद्यापीठाकडून कायदा विषयात पीएचडी पदवी प्रदान
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील नामांकीत डॉ बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रा नितीन रामलिंग कुंभार यांनी कायदा विषयात पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात होत आहे.
“मर्जर्स अँड अक्विज़ीशन इन सिविल एव्हियेशन सेक्टर; कॉम्परेटीव्ह स्टडी बीटवीन इंडिया अँड यूनिटेड़ स्टेटस ऑफ अमेरिका” या व्यवसायिक कायदा विषयावर त्यानी पुणे विद्यापीठाला आपला शोध प्रबंध सादर केला. त्यांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून आयएलएस लॉ कॉलेजचे नामवंत प्रा डॉ नीतीश नवसागरे यांचे मार्गदर्शन लाभले. या विषयावर भारतामध्ये काही मोजक्याच लोकानी संशोधन केले आहे.
कुंभार हे प्राध्यापक म्हणून 13 वर्ष सेवा देत आहेत. रयत शिक्षण संस्था व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थामध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावीत आहेत त्यापूर्वी ते महावितरणमध्ये विधी अधिकारी म्हणून सेवा केली.पुणे येथील कर्णिक अँड कर्णिक या नामवंत लॉ फर्म मधून त्यांनी कायदा क्षेत्रात पदार्पण केले आहे. कुंभार यांचे आतापर्यंत विविध कायदा विषयावर लेखन प्रकाशीत झाले आहे. कुंभार हे एलएलएम पुणे विद्यापिठामधून 2008 साली उत्तीर्ण झाले आहेत. नेट व सेट या दोन्ही परिक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयात आयक्युयेसी ते समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.