जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीमध्ये असमतोलपणा अजिबातच झालेला नाही – साळुंके
आ राणाजगजितसिंह पाटील यांचा खोडसाळपणा, उलट त्यांनीच अन्याय केला – त्या पत्रात तथ्य नाहीच
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते विकास निधी वाटप चारही विधानसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी समान पद्धतीने केलेला आहे. मात्र या निधी वाटपामध्ये असमतोलपणा झाला असल्याचा आरोप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केला आहे. तो आरोप खोडसाळपणाने, अतिशय चुकीचा, साफ खोटा व गैरसमजातून केला असल्याचा पलटवार बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत १७ फेब्रुवारी रोजी केला. पूर्वीच्या निधी वाटपाबाबत आमदार राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, मोहन पणूरे व तालुकाप्रमुख अजित लाकाळ, सनी पवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी २०२२ चा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ते विकास कामांसाठी उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा-उमरगा व परंडा-भूम-वाशी या चार मतदार संघासाठी रस्ते विकास निधीचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी समान पद्धतीने वाटप केलेले आहे तर ७० निधी वाटप केला असून उर्वरित ३० टक्के निधी ऐनवेळच्या इतर कामांसाठी राखीव ठेवलेला आहे. मात्र आजपर्यंत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत २०१७-१८ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी १३ लाख २० हजार तर उस्मानाबाद – कळंब मतदार संघासाठी १९ लाख २० हजार व तुळजापूर मतदार संघासाठी १० लाख ८० हजार तर लोहारा-उमरगा ३४ लाख ८० हजार रुपये तसेच २०१८-१९ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी ६१ लाख तर उस्मानाबाद – कळंब मतदार संघासाठी ५० लाख व तुळजापूर मतदार संघासाठी ७७ लाख ५० हजार तर लोहारा-उमरगा १११ लाख ५० हजार रुपये तसेच २०१९-२० मध्ये मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी ४७ लाख तर उस्मानाबाद – कळंब मतदार संघासाठी ९५ लाख व तुळजापूर मतदार संघासाठी ८९ लाख तर लोहारा-उमरगा १६९ लाख रुपये तसेच २०२०-२१ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी १५० लाख तर उस्मानाबाद – कळंब मतदार संघासाठी २८५ लाख व तुळजापूर मतदार संघासाठी २१३ लाख तर लोहारा-उमरगा ४०३ लाख रुपये तसेच २०२१-२२ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी १४३ लाख ३२ हजार तर उस्मानाबाद – कळंब मतदार संघासाठी ३१७ लाख ५० हजार व तुळजापूर मतदार संघासाठी २९६ लाख तर लोहारा-उमरगा ४८४ लाख ५० हजार रुपये अशा निधीचे वाटप केले आहे. यामध्ये परंडा-भूम-वाशी या मतदारसंघावर आमदार राणा पाटील यांच्यासह आ कैलास पाटील व खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अन्याय केलेला आहे.
शाळेच्या बांधकामासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत उस्मानाबादसाठी १९७७ लाख ५४ हजार रुपये तर तुळजापूरसाठी १३८३ लाख ७ हजार रुपये तसेच लोहारा-उमरगासाठी ७७७ लाख ८ हजार रुपये तर परंडा-भूम-वाशी या मतदारसंघासाठी केवळ १०३९ लाख २५ हजार रुपये निधी वाटप करुन या मतदारसंघावर फार मोठा अन्याय केलेला आहे. यासह उपकेंद्र बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उप प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, यात्रास्थळाच्या विकास साठी जिल्हा परिषद अनुदान निधीतून तसेच ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण, इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, लघु पाटबंधारे योजना कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व नीती आयोग योजना, जन सुविधा योजना, नागरी सुविधा योजना, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, अंगणवाडी शौचालय बांधकाम व किरकोळ दुरुस्ती, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान, नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजना, अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना या योजनांमध्ये देखील परंडा-भूम- वाशी या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी निधी देताना फार मोठा अन्याय केलेला असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला.
तुळजापूर मतदारसंघात लमान समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे खरे असले तरी परंडा-भूम-वाशी या मतदारसंघात धनगर समाजाची सर्वात जास्त लोकसंख्या आहे. तो देखील भटका विमुक्त असून त्यांच्या विकासासाठी निधी देणे आवश्यक होते. मात्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तो फक्त तुळजापूर मतदारसंघात नेऊन या भागातील धनगर समाजाच्या हक्कावर गदा आणली असल्याचा आरोप त्यांनी केला.
चारही मतदारसंघात विकास करण्यासाठी आज पर्यंत दिला गेलेला निधी कोणत्या मतदारसंघात जास्त दिला आहे याच्या याद्या पत्र देणाऱ्या आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तपासाव्यात. त्यामुळे पालकमंत्री सावंत यांनी २०२२ मधील रस्ते विकास निधी ७० टक्के समान पद्धतीने वाटप केला असून उर्वरित ३० टक्के निधी एखादी आपत्ती आली तर त्यासाठी राखीव ठेवलेला आहे. यापुढे देखील जिल्ह्याच्या विकासासाठी समान पद्धतीने निधीचे वाटप केले जाईल असे आश्वासन जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी दिले.