धाराशिव – समय सारथी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली आहे त्यामुळे आगामी काळात दारू माफिया रडारवर असणार आहे. धाराशिव शहरातील राजा वाईन शॉपच्या अडवाणीवर 3 गुन्हे नोंद तर इतर 11 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.राजा अडवाणी याच्या दुकानातून शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्य विकले जाते. ढाबा, हॉटेल या ठिकाणी याच दुकानातून मोठ्या प्रमानात विक्री होत आहे त्यामुळे ठोस कारवाईची गरज आहे शिवाय हे दुकान मुख्य चौकात असल्याने अनेक घटना घडल्या आहेत.
विशेष मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला 35 लि. गावठी दारु, 50 लीटर सिंधी ताडी अम्ली द्रव,देशी विदेशी दारुच्या 210 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,90,015 आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. भाउसाहेब वाल्मीक बनसोडे, नारायण राजेंद्र श्रीरामे व संजय आडवाणी राजा वाई शॉप हे धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडचे डावे बाजूस आडत लाईनचे समोर अंदाजे 52 हजार किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्यासह मोटरसायकल जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या एका छाप्यात धनराज दासप्रसाद गायकवाड, राजपाल प्रविण बनसोडे व संजय आडवाणी रा राजा वाईन शॉपी हे धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडचे उजवे बाजूस काळा मारुती मंदीराकडे जाणारे रोडलगत अंदाजे 51 हजार 320 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
एसडीपीओ कार्यालय धाराशिवचे पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी महादेव गुरुबा जाधव व संजय आडवाणी हे विसर्जन विहीरीचे जवळ समतानगर धाराशिव ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 49 हजार 175 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.