धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण सर्वेक्षण कामाच्या पाहणीसाठी राज्य मागासवर्ग आयोग व जिल्हाधिकारी यांनी घरोघरी जात पाहणी केली व आढावा बैठक घेतली. कर्मचारी कसे सर्वेक्षण करीत आहेत याची पाहणी केली. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ गोविंद काळे व जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे हे सर्वेक्षन पाहणीसाठी नागरिकांच्या घरी गेले. यावेळी तहसीलदार शिवानंद बिडवे, नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यासह अधिकारी उपस्थितीत होते.
मराठा व इतर कुटुंबाच्या घरी जाऊन सर्वेक्षण घेतली माहिती, नागरिक, प्रगणक (नोंदी घेणारे कर्मचारी) यांच्याशी चर्चा केली. धाराशिव जिल्ह्यातील 50 हजार कुटुंबाची माहिती भरण्यात आली असुन जवळपास 15 टक्के कुटुंबाचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. जिल्ह्यात 400 प्रगणक सर्वेक्षण करीत आहेत. सर्वेक्षण करताना ज्या तांत्रिक अडचणी आल्या त्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य काळे यांनी सोडाविल्या. या बैठकीला सर्व तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थितीत होते.