10 हजाराची लाच घेताना तलाठी अटकेत – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी या गावचा तलाठी रवींद्र अंदाने यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. धाराशिव लाचलुचपत विभागाने ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 15 हजार लाचेची मागणी करुन 10 हजार घेताना पकडले आहे.
तक्रारदार यांच्या मालकीच्या शेतजमिनीची संमतीपत्राप्रमाणे पत्नी व मुलाच्या नावे फेरफारला (खाते फोड) नोंद घेण्यासाठी 15 हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच स्वीकारण्यास संमती देऊन 10 हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली.
सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाने ही कारवाई केली.सापळा पथकात अंमलदार दिनकर उगलमुगले, शेख, विष्णू बेळे, झाकीर काझी याचा समावेश होता.