धाराशिव – समय सारथी
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचा असून त्यांनी सरकारला जेरीस आणला आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं, यांच्यापासून सावध राहायला हवं ते घात करतील प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. आरक्षणावर सरकार झुलवत ठेवत आहे, सरकार जरांगे यांना फसवणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्ला दिला.
प्रकाश आंबेडकर हे आज धाराशिव येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहेत. यावेळी अर्जुन सलगर, सचिन शेंडगे यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
गायकवाड समितीने सांगितले आहे की मराठा गरीब नाही हे समोर आले आहे. गरीब मराठा वेगळा आहे, समस्या वेगळी आहे, कुळ बटाईने काम करीत होता त्याची स्तिथी बदलली नाही. गरीब मराठा यांना जरांगे न्याय देऊ शकतील.गरीब मराठा याला आरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसीतुन कायदेशीर अडचणीमुळे देता येणार नाही,त्यामुळे गरीब मराठा असा वेगळा गट तयार करावा. रस्त्यावर उतरून ठिणगी पेटण्याचं काम सुरु आहे,त्यामुळे वाद घालू नये, सुप्रीम कोर्टचे आरक्षणबाबत नियम पाळावे असे आंबेडकर म्हणाले.
श्रीमंत मराठा आतुरतेने लोकसभेची वाट पाहत आहे, ते आंदोलन जिरवतील. निजामी मराठ्यांनी आजवर अनेक आंदोलने जिरवली, हे आंदोलन जिरणार नाही याची काळजी घायवी लोकसभा महत्वाची आहे, गरीब मराठा बाबत निर्णय लोकसभा निवडणुकीपुर्वी होऊ शकतो. जरांगे यांनी लोकसभा भुमिकेबाबत ठोस निर्णयसाठी विचार करायला हव असे आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे हे ज्या आंदोलनात चालतात, त्या आंदोलनात त्यांनी मोजकी लोक सोडून सामान्य लोकात जेवण केलं पाहिजे असा देखील एक आगळावेगळा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. भाजपचा अजेन्डा हा दंगलीचा आहे ते त्या शिवाय जिंकत नाहीत, मुस्लिम लोकांनी 2 महिने कळ काढा, लोकसभेत भाजपला हरवला असे आवाहन त्यांनी मुस्लीम समाजाला केले.
आरक्षणाच्या मुद्याला घेऊन मराठा व ओबीसी समाज उभा ठाकला आहे या दोन्ही समाजात मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यापुर्वी देखील मी मध्यस्थी केली आहे. मागील वेळी पण मीच संभाजी जिजाऊ ब्रिगेड व ओबीसी यात मी समेट घडवील असे ते म्हणाले.
भारत देशात धर्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे पण त्या अगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती पण आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे
आपण काही केलं असेल तर घाबरू नका आपली संपत्ती जाहीर करा असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवार यांच्या ईडी कारवाईवरून व्यक्त केले आहे