धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असुन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी स्वतः सर्वेक्षण पथका सोबत नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. मोबाईल अपमध्ये प्रत्येक घराची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून घेतली जात आहे यात 184 प्रश्न विचारले जात आहे, सर्वेक्षण केलेल्या घरावर मार्किंग केली जात आहे आगामी 31 जानेवारी पर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रवीण पांडे, धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांचे पथक आहे.