हक्कभंगाची नोटीस, आमदार धस यांचा दणका – तत्कालीन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्यासह मुख्याधिकारी यलगट्टे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या बँक खाती आणि धनादेश याची मागितलेली माहिती अपूर्ण व चुकीची दिल्याप्रकरणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी हक्कभंग दाखल केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची व हक्कभंगाची सुचना देण्यात आल्याचे कळते. उपसभापती यांनी सखोल लेखी खुलासा 13 मार्च 2023 पर्यंत मागितला आहे. या प्रकरणामुळे विधीमंडळात कारवाईची टांगती तलवार आहे.
धाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी विविध विकास कामांची देयके अदा करणेसाठी मोठ्या प्रमाणावर धनादेशाचे वाटप केले परंतु निधी शिल्लक नसल्याने मोठ्या प्रमाणावर दिलेले धनादेश वटले नाहीत अश्या न वटलेल्या धनादेशाची माहिती विधिमंडळ कामकाजासाठी स्थनिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली होती.विधिमंडळ अधिवेशनासाठी मागितलेली माहिती 6 पत्रे देऊनही देण्यात आली नाही व नंतर अर्धवट चुकीची अपूर्ण दिशाभुल करणारी देण्यात आली, त्यानंतर 3 पत्रे देऊनही कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
आ सुरेश धस यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीकडे तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची व हक्कभंगाची सुचना देण्यात आली असल्याची माहिती आहे.