धाराशिव – समय सारथी
एकीकडे अयोध्या येथे रामलल्ला यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली त्याचं मुहूर्तावर धाराशिव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव येथे मोदींचे भव्यदिव्य मंदीर उभारण्यात येणार असुन यात प्रभु श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा असणार आहे तर त्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाची माहिती व शेतकरी आणि लाभार्थी यांच्यासाठी संगणक सुविधा केंद्र असणार आहे.धार्मिक विधी व जयघोषात भूमिपूजन करण्यात आले, आगामी 2 वर्षात हे मंदीर साकारण्यात येणार आहे.
शेतकरी,शेतमजूर जगला तर देश वाचेल आणि त्यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे त्यामुळे मोदी यांचे मंदिरात या सर्व योजनाची माहिती व सुविधा मदत केंद्र असणार आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी ही संकल्पना मांडत ती पुर्ण करण्याचा निश्चिय केला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे मंदीर हे केवळ इतर मंदीर सारखे नसुन यात भक्ती सोबतच समाजसेवेचे कार्य सुद्धा चालणार आहे त्यामुळे हे बांधावे असे वाटले, देशातील हे पाहिले मंदीर असेल असा दावा निटुरे यांनी केला असुन हे एक मॉडल ठरणार आहे त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी हाच उपक्रम राबवीला जाईल असे ते म्हणाले.
निटुरे यांनी सपत्नीक पुजा करुन भूमिपुजन केले यावेळी परिसरातील नागरिक उपस्थितीत होते. पुढील वर्षी हे मंदीर पुर्ण केले जाईल व लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी पंतप्रधान होतील आणि मोदी व शहा यांना याच्या लोकार्पणासाठी आमंत्रित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.