गुन्ह्यांची मालिका – तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यावर 2 गुन्हे नोंद
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या विरोधात 2 वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या बँक खात्यांची व दिलेल्या चेकची माहिती न दिल्याने अदखलपात्र तर शहरातील 22 मालमत्ताना नियमबाह्य व बेकायदेशीरपणे 8 अ उतारा दिला मात्र चौकशी सुरु होताच संचिका गायब केल्या प्रकरणी यलगट्टे यांच्यासह लिपीक राजेंद्रकुमार शिंदे यांच्यावर कलम 197,471,477 अ, 201 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न व हक्कभंग सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले त्यानुसार कारवाई करण्यात आली.
आमदार सुरेश धस यांनी दाखल केलेल्या हक्कभंग आणि नगर परिषदेच्या विविध ठिकाणी झालेल्या भंगार चोरी प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व यलगट्टे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.