विधी महाविद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करुन महिला दिन साजरा
महिलांच्या आरोग्याची काळजी ही सर्वांची जबाबदारी – डॉ बोडके
धाराशिव – समय सारथी
बदलत्या जीवनशैली व धावपळीच्या काळात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत चालले असुन त्याच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे. रक्ताशय, विविध प्रकारचे कॅन्सर याची तपासणी करुन वेळीच निदान गरजेचे आहे. महाविद्यालयीन मुलींनी आहाराच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे तसेच दररोज किमान अर्धा तास स्वतःच्या आरोग्यासाठी देत योगा, व्यायाम करावा. विधी शाखेच्या विद्यार्थीनी महिलांचे हक्क संरक्षित राहून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगत प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट तथा जिल्हा शासकीय रुग्नालयातील ट्रैनिंग सेंटरच्या प्रमुख डॉ चंचल बोडके यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात. 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याकरिता महाविद्यालयने रक्तदान हा उपक्रम राबविला. याप्रसंगी डॉ चंचल बोडके याना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. त्यानी आपल्या भाषणात महिलांना आरोग्याविषयी जागरुक असण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ बोडके यांनी कोरोना काळात केलेल्या रुग्णसेवेच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा डॉ. नितीन कुंभार यांनी महिला दिन साजरा करण्यामागचा इतिहास सांगून त्याचे भारतीय संविधान याशी असणारे नाते विषद केले.एनएसएस समन्वयक प्रा इक्बाल शहा यांनी जळगाव येथे आव्हान या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थांची ओळख तसेच त्यांनी घेतलेले प्रशिक्षण याबाबतीत माहिती दिली.विद्यार्थिनींचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्रतिनिधींचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.रक्तदान शिबिरात प्राचार्य डॉ व्ही जे शिंदे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी यानी मिळुन रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पूनम तापडीया यानी तर आभार प्रदर्शन प्रा चांदणी घोगरे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संजय अंबेकर, प्रा सोनाली पाटिल, प्रा अजित शिंदे, प्रा के पी शिकारे, प्रा श्रीयश मैंदरकर व शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले.