कमिशनखोरांना शिवसैनिकच उत्तर देतील – माजी आमदार राहुल मोटे यांचा छपरी असा उल्लेख
भुम – समय सारथी
लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या व अधिकार काय हे लक्षात घेतले पाहिजे.लग्नात, वाढदिवस, बारशाला हजर राहणे म्हणजे विकास नाही.. लग्नात अगोदरच मुलीचे आई वडील थकलेले असतात, त्याचाच बुके सत्कार घेऊन त्यांना हजाराचे नुकसान करणे म्हणजे विकास नाही. आणि ह्याच नेत्याला लोकांनी निवडून द्यायचे, विकास नावाचा काही संबंध नाही. वचननामे व आश्वासन वाचा आपण काय केले, फक्त बोलून थांबणे वेगळे व काम करणे वेगळे. 25 वर्षाचा इतिहासात सत्ता घरी नातेवाईक यांच्यात होती तेव्हा 2 रुपयाचा विकास करता आळा नाही, स्वतःची ठेकेदारी व गुत्तेदारी पुरती कामे केली. त्यांच्या गावासह इतर भागात पाणी पुरवले, स्वतःच्या गावात स्मशानभुमी करू शकला नाहीत यापेक्षा विदारक चित्र दुसरे काय आहे.
मी विकास केला नसेल तर जोडे घ्यायला तयार आहे हे मी आव्हान देतो असे म्हणत मंत्री सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर टीका केली. मिस्टर 10 पेरसेन्ट म्हणत बालवाडी पर्यंत शिक्षण झाले आहे का ? विद्वानच्या चपल्या घेऊ मात्र मुर्खाचे मालक होणार नाही कारण तो त्याच्या रांगेत उभा करतो. लाय मी त्याला बोलणार नाही, शिवसैनिक उत्तर देतील. अधिकारी यांना पिशवी घेऊन भेटत होता, मी अधिकारी यांचा चहा, जेवण खात नाही. शेण खाऊन गुळण्या करतो त्याला तेच दिसणार. मी पांडुरंग व श्रीराम भक्त आहे मला चांगलेच दिसते असे मंत्री सावंत म्हणाले. 11 लाख 69 हजार वारकरी यांची रुग्णसेवा केली. वारीत 154 वारकरी यांचे प्राण वाचविले हे वस्तूस्तिथी आहे, माझं शिकायला पुढचा जन्म घ्याला लागेल मात्र त्या जन्मात सुद्धा ते 10 टक्के कमिशन मागेल.
मी स्वतः कामाने कष्टातून शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, साखर कारखाना सुरु करताना अडचणीत आणल्या तरी मी तो सुरु केला. त्याचं दिवशी ठरविले होते याला आमदारकी निवडणूकित पटकवून पाडणार आणि ते मी करुन दाखविले. शेतकऱ्यांसाठी मी दूत व नागरिकांचा सेवक म्हणून आलो आहे. मी वारकरी आहे, जेसीबी. पायात चप्पल नसताना मी कॉलेजमध्ये शिकवायला गेलो तेव्हा पतंगराव यांना सांगितले पैसे नाहीत, म्हणाले 6 महिन्यात पगार वाढ. भरती विद्यापीठत शिकवायला असताना माझा निकाल काही 90 टक्के खाली आला नाही. भुम परंडा वाशी भागात विकास हा शब्द डिशनरीमध्ये नव्हता तो मी आणला व विकास केला. 6 महिन्यात बाजार समिती सुसंज्ज करू, जिथे कमी तिथे आम्ही. कोणी हौसेने घर सोडून जात नाही, पश्चिम महाराष्ट्रच्या पुढे कनभर जास्त विकास करू असा संकल्प सावंत यांनी व्यक्त केला.
दिले तर ठीक नाही तर मी जनतेसाठी हिसकावून घेतो अशी माझी ओळख आहे.जनतेसाठी नाही म्हणलं की काही राडा घालीन म्हणून माझ्या सर्व मागण्या मंत्री मंडळात मान्य होतात व लोकांना निधी मिळतो असे मंत्री सावंत म्हणाले.
मी जनतेचा सेवक आहे, सहीचे अधिकारी आहे त्यामुळे महावितरण कामे करण्यासाठी मी जिल्ह्याच्या निधीच्या 50 टक्के निधी आणला त्यामुळे कामे करुन घ्या. छपरी लोकप्रतिनिधी यांनी इतके दिवस दबावात काही मागणी काम केले नाही. हरितक्रांती,धवलक्रांती व शिवजल क्रांती या 3 क्रांतीचा वसा घेतला असुन श्वास असेपर्यंत हे स्वप्न पुर्ण करणार असे मंत्री सावंत म्हणाले. काम होत असेल तर हो नाहीतर लागेच नाही असे मी स्पष्ट सांगतो. जो काम करणारा ठेकेदार चांगला तो माझा, शेतकऱ्यासाठी कोणाशीही पंगा घ्यायला तयार आहे कारण ही ताकत अध्यातमातून येते असे सावंत म्हणाले. सबस्टेशनसाठी जमिनी घ्या त्यासाठी 50 टक्के रक्कम मी स्वतः देतो, बाकीचे पैसे जमा करा किंवा 99 टक्के मी देतो. मागणी करुन घोषणा करुन काही होत नाही प्रत्यक्षात काम करावे लागते.
माझे वडील रेल्वेच्या कामावर दगड फोडत होते, आम्हाला कुणी दगड मारले नाहीत आणि तुम्ही फुले उधळलीत. अध्यात्मतील असल्याने आम्ही फुले देतो, मला जेसीबीने फुले उधळून इतका मान दिला मात्र भविष्यात देऊ नका, मी सेवा करेल असे सावंत यांनी सांगितले.भूमिपूजन केलेल्या ठिकाणी 24 तासात काम सुरु झाले पाहीजे अशी ताकीत सावंत यांनी दिली.
माझ्या जिल्ह्याच हक्काचं 23 टीएमसी पाणी आणणे हे काम आहे त्यासाठी मी नियोजन, आराखडे तपासले, अधिकारी यांची बैठक घेतली. हे पाणी उजनी येथे आणून नंतर लिफ्ट करुन पाण्याचा वापर फक्त बारामतीसाठी होता मात्र मी ते होऊ देणार नव्हतो. जेव्हा 7 हजार कोटींचा सिंचन घोटाळा निघला तेव्हा श्वेतपत्रिका काढावी लागली. 60 हजार कोटी खर्चून 0.2 टक्के क्षेत्र बागायत झाले त्याचा काय फायदा नाही झाला.
23 टीएमसी पाण्याबाबत मी उपोषणाचा इशारा दिल्यावर व श्वेतपत्रिका मागणीसाठी आग्रही झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेतल. सरकारने कामाचा प्राधान्यक्रम बदलला व त्यामुळे आता ते 11 हजार 500 कोटी मंजुर केले व आज जेऊर ते मिरगव्हाण काम 70-75 टक्के काम पुर्ण झाले आहे, ते मी सर्वांना घेऊन फेब्रुवारी महिन्यात दाखवणार आहे की हा सूर्य हा जयद्रथ दाखवणार. मी मागील मंत्रिमंडळात मंत्री असतो तर ते अगोदर आले असते व जलपूजन झाले असते. यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये पाणी आलेच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र किस झाड की पत्ती आम्ही शेतीत जास्त उत्पन्न घेऊन दाखवू. स्वतःच्या स्वार्थासाठी पाण्याचा विकास होऊ दिला नाही असा आरोप केला.
सर्व भारतीय यांचे 500 वर्षाच्या लढाई, बलिदान याचे राम प्रतिष्ठापणा स्वप्न पुर्ण होत आहे, सर्वांनी 5 पणत्या लावुन रामरक्षा पठण करावे असे आवाहन केले व सर्वांना राम मंदीर कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.पालकमंत्री डॉ सावंत यांचा सकल देवांग कोष्टी, मराठा, ब्राह्मण,वडार, मुस्लिम, ढोर, लिंगायत, पारधी, नाभिक, माळी, सुतार समाजासह भजनी मंडळ, उद्योजक, कर्मचारी संघटना यांच्या वतीने सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परीषद अध्यक्ष धनंजय सावंत,माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके अण्णासाहेब देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे, तालुका प्रमुख राहुल डोके, युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, बाळासाहेब हाडोंग्रीकर, जाकीर सौदागर, निश्चित चेडे, दत्ता मोहीते, बालाजी गुंजाळ, गौतम लटके, संजय पवार, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, ऍड सत्यवान गपाट यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
भुम शहरात उपजिल्हा रुग्णालय व स्वतंत्र महिला रुग्णालय आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिले त्याबद्दल संयोगिता गाढवे यांनी आभार मानले, मंत्री सावंत हे पालक म्हणून न मागता देतात. दूरदृष्टी असल्याने ते विकासाचे निर्णय पटकन घेतात. शहरात सोनोग्राफी व डायलीसिस मशीन द्यावी अशी मागणी करीत त्यांनी भुम नगर परिषद राज्यात प्रथम आनण्याचा संकल्प व्यक्त केला. भाऊ म्हणून ओवाळणी म्हणून 1 महिन्याच्या आत डायलीसिस मशीन देणार तसेच मार्च अखेर सीटी स्कॅन मशीन देणार असे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. 8 दिवसाच्या आत 46 कोटी रुपये मंजुर करू असे मंत्री सावंत म्हणाले.