धाराशिव – समय सारथी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पत्रकार परिषदेला आमदार राणा यांच्या शेजारी बसलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील हे त्यांच्या कानात सांगताना दिसत आहेत.
पत्रकार परिषदेत पत्रकार यांनी आमदार राणा यांना विचारले की आपण दिल्लीला गेला होतात, खासदारकी निवडणुक लढवणार का ? तसेच भाजपमधुन त्यांच्या नावाला उमेदवार म्हणून पसंती आहे. त्यावर पत्रकार यांचा प्रश्न संपण्यापूर्वीच नेताजी पाटील यांनी तात्काळ आमदार राणा यांना अलर्ट केले व त्याच्या कानात सांगितले की लोकसभा क्लस्टरची नेमणूक झाली हे सांगा. त्यानंतर राणा यांनी हेच उत्तर दिले.
आमदार राणा म्हणाले की, बीड लातूर धाराशिव या लोकसभा क्लस्टरची जबाबदारी पक्षाने मला दिली होती त्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो, मी जबाबदारी पासुन पळणारा माणूस नाही, मी राज्यात की केंद्रात राहणे योग्य आहे याचा निर्णय पक्ष घेईल तो अधिकार मला नाही. पक्ष जो आदेश देईल त्यांचे पालन करील असे आमदार पाटील यांनी सांगितले.
आमदार राणाजगजीतसिंह हे कदाचित दिल्लीला गेल्याचे इतर कारण सांगतील म्हणून नेताजी यांनी सांगितले असावे. आमदार पाटील यांच्या दिल्लीवारीवर वेगवेगळे कायास लावले जात आहेत.
दिल्लीत कशाला गेला होता हे सुध्दा आम्हाला ठाऊक आहे ते पण योग्यवेळी नक्कीच सांगु अन् निवडणुक लढायला तर तुम्ही कायमच तत्पर असतात. दुसर्या कोणाला उमेदवारी मिळु नये यासाठी तुमची धडपड सर्वांच्याच लक्षात येत आहे. पक्ष बदलला म्हणजे आत्मकेंद्री स्वभाव बदलत नसतो असाही टोला खासदार ओमराजेंनी आमदार पाटील यांना काल प्रसिद्धी पत्रक काढून लगावला होता.