ढोकी – समय सारथी
तेरणा कारखान्याच्या माजी कर्मचाऱ्यांचा यांच्यासाठी खुशखबर असुन त्यांचा PF जमा करण्यात आळा आहे, पीएफ मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे देण्याचे आवाहन अवसायक विजय घोणसे यांनी केले आहे.
अवसायनातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्व माजी कर्मचारी यांना कळविण्यात येते की, आपला थकीत प्रॉव्हिडन्ट फंड, कारखानाच्या अवसायकानी पीएफ ऑफिस सोलापूर येथे भरणा केलेला आहे. सदर कर्मचाऱ्याचे 3 व 6 फॉर्म देखील पीएफ ऑफिस सोलापूर येथे दाखल केलेले आहेत मात्र 3 फॉर्म ऑनलाईन भरणा करण्याच्या सूचना पीएफ ऑफिसने दिलेल्या आहेत आणि 3 फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी UAN नंबर असणे आवश्यक आहे.
UAN नंबर नसल्यामुळे पीएफची रक्कम संबधीत कर्मचार्यांंच्या खात्यावर जमा करता येत नाही. त्याकरीता UAN नंबर बनवण्याकरता आधार नंबर आवश्यक आहे. आधार नंबर प्रमाणे नाव आणि जन्मतारीख, पूर्वीच्या दिलेल्या रेकॉर्ड प्रमाणे सणे आवश्यक आहे. नसेल तर आधार अपडेट करून त्याची झेरॉक्स व ( Joint Decleration From ) भरून अवसायकाच्या ऑफिसला द्यावयाचा आहे. त्या आधारे UAN नंबर बनवण्यात येईल तेव्हा सर्व माजी कर्मचारी यांनी आपापले आधार नंबरची झेरॉक्स प्रत (त्यावर मोबईल नंबर लिहून) अवसायकाच्या कारखान्यावरील ऑफिसला लवकरात लवकर आणून द्यावी असे आवाहन विजय एस. घोणसे, अवसायक तेरणा कारखाना यांनी केले आहे.