विकास कामे, दांडगा जनसंपर्क, अनुभव ह्या जमेच्या बाजु – सक्षम पर्याय
धाराशिव – समय सारथी
येणार्या विधानसभेला पक्षाकडून मला ही संधी मिळू शकते, असे मत शिवसेना धाराशिव सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी भूम येथील कार्यक्रमात व्यक्त केले आहे. बोरकर यांनी उमेदवारीवर दावा ठोकल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बोरकर यांचे विकासाचे व्हिजन, आजवर केलेली कामे, लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव व दांडगा जनसंपर्क ही त्यांच्या जमेच्या बाजु आहेत त्यामुळे ते एक सक्षम पर्याय आहेत.धनश्री उद्योग समुहाच्या माध्यमातून ते यशस्वी उद्योजक आहेत.
शंकरराव बोरकर हे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, त्यांना पक्षाने 2009 साली विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यात त्यांनी कडवी झुंज दिली होती, त्यांचा 6 हजार मतांनी पराभव झाला त्यावेळी पक्षाच्या काही नेत्यांनी काही ठिकाणी छुपी व काही ठिकाणी उघड मदत केल्याने त्याचा फटका बसला. 2009 साली राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांना 83 हजार 425 मते पडली तर बोरकर यांना 77 हजार 423 मते पडली. आजही त्यांचे मतदार संघात प्राबल्या आहे, त्यामुळे ते सक्षम उमेदवार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 च्या विधानसभेला निष्ठावंत कार्यकर्ते व एकनिष्ठ राहणार्यांचाच विचार करतील, असा आत्मविश्वास बोरकर यांनी व्यक्त केला.भूम येथील शिवसेना (ठाकरे) महिला जिल्हा संघटकपदी झीनत कोहिनूर सय्यद यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यासाठी भूम येथे शंकरराव बोरकर आले होते. त्यांच्याशी पत्रकारांनी हितगुज केले असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.याप्रसंगी प्रल्हाद आडागळे, श्रीनिवास जाधवर, सय्यद, विष्णू गवळी, बालाजी कुटे आदी उपस्थित होते.
मी पक्षासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा विविध निवणुका लढवल्या असून कुठल्याही पदाची अपेक्षा केलेली नाही. पक्षाशी व ठाकरे घराण्याची एकनिष्ठ राहून मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी निश्चितपणाने पार पाडली आहे व पार पाडीत राहणार आहे. एकंदरीत सध्याचे खोक्याचं वातावरण पाहता पक्षप्रमुख हे निष्ठावंतांचा विचार निश्चितपणाने आगामी निवडणुकांमध्ये करणार हे तितकेच खरे आहे. मला सुद्धा भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघासाठी जो मतदारसंघ आजतागायत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला मानणारा असून विधानसभेची संधी मला मिळू शकते असे ते म्हणाले.