कारवाईचा बडगा – धाराशिव जिल्हा परिषद व महसूलच्या संपकरी 4 हजार 162 कर्मचारी यांना नोटीसा
धाराशिव – समय सारथी
जुनी पेन्शन योजनेत सहभागी संपकरी कर्मचारी यांच्यावर कारवाईस सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 3 हजार 612 तर महसूल विभागाच्या 550 अश्या 4 हजार 162 कर्मचारी यांना नोटीस बजावण्यात आली असुन तात्काळ कामावर हजर न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. महसूल व जिल्हा परिषद विभाग सोडून अन्य विभागाला सुद्धा कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 3 हजार 612 कर्मचारी यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी दिली.
सेवेत रुजू न झाल्यास शिस्तभंगाची तसेच सेवेमध्ये खंड असल्याची कारवाई होऊ शकते. नोटीस दिल्यानंतर किती कर्मचारी हजर होतात हे पाहावे लागेल.