धाराशिव – समय सारथी
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण रूपरेषा जाहीर करण्यात आली असुन 20 जानेवारीपासुन राज्यभरात प्रशिक्षण सुरु होणार आहे.
जिल्हा व महानगर स्तरीय प्रशिक्षण हे गोखले इन्स्टिटयूटचे प्रशिक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन देतील त्यानंतर 21 व 22 जानेवारीला तालुका स्तरीय प्रशिक्षण होईल असे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. सर्वेक्षण झालेल्या घरावर मार्केर पेनने चिन्हाकन केले जाणार असुन त्याची तयारी करण्यात आली आहे.
मराठा व खुल्या प्रवर्गातील 100 कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी 10 हजार मानधन दिले जाणार आहेत तर मागासवर्गीय प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षनासाठी प्रति कुटुंब 10 रुपये मानधन मिळणार आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन ते पुर्ण केले जाणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन महत्वाच्या सुचना व आदेश देण्यात आले आहेत.