धाराशिव – समय सारथी
मोदी यांचा राजकारणात जन्म 2014 साली झाला त्याआधी कल्पना नरहिरे खासदार होत्या त्यावेळी कोण होते. त्याआधी शिवाजी कांबळे खासदार होते हे भाजप विसरले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेने विजय मिळवीला. महायुती मेळाव्यात व्यासपीठवर ढकला ढकली होती, भाजपचे लोकही मला खासगीत सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जुन्या भाजप लोकांना आवडत नाही की ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्या सोबत काम करायचे, आता हीच जुनी भाजप मंडळी फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत असे खासदार ओमराजे म्हणाले. जय श्रीरामच्या खासदार ओमराजे यांनी घोषणा दिल्या. जसे शिवसेनामध्ये झाले तसे भाजपात झाले तर पक्ष त्या गटाला देणार का असा सवाल केले. भाजप मंडळी खासगीत कबुल करतात की शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने लोकमत खराब झाले आहे.
आपल्याला खोका पेटीची अपेक्षा नाही. मंत्री होता येत नाही, सरकार येत नाही यामुळे क्षणाचा विचारही न करता काहींनी पक्ष बदलला तर ज्या पक्षप्रमुख यांनी आमदार केले ते फुटून गेले व पक्षाला विसरले मात्र आम्हाला अभिमान आहे, परिणामाची पर्वा केली नाही त्यांच्याशी गद्दारी केली नाही असे म्हणत त्यांनी मंत्री सावंत व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली. मी नियती व कर्मावर विश्वास ठेवतो, तेव्हा श्रीराम सुद्धा साथ देतात मात्र काही लोकांच्या मनात कायम काळे आहे अशी टीका खासदार ओमराजे यांनी केली. बापाची संपत्ती विकावी 5 हजार कोटी खर्च करावे व सत्कार करावा, मात्र टॅक्स व नागरिकांचे पैसे खर्चून सत्कार केला जातो. तुळजापूर येथे रस्ते अवस्था काय हे जाऊन पहा असे ओमराजे म्हणाले.
पैसेवाल्याचा माज कसा जिरवायचा, त्याचे पैसे घेऊन काय करायचे हे लोकांना माहिती आहे त्यामुळे पैशाचा सुनामी आला तर काय करायचे हे लोकांना कळते. विकास कामे अडवायचे त्यामुळे जनता लायकी दाखवले. राममंदीर हे सुरु आहे, कळस झाल्यावर प्राणप्रतिष्ठापणा केली जाते मात्र राममंदिर कळस नसताना हे सुरु आहे, भाजपला राममंदिर एक इव्हेंट करायचा आहे. एखाद्याला मदत, रुग्णसेवा हीच खरी परमेश्वर भक्ती, आशीर्वाद आहे.
शिवसेनेवर निष्ठा प्रेम काय असते हे आजच्या कार्यशाळेत दिसून येत आहे.मतदार आपल्या सोबत आहे, ज्या दिवशी मी खासदार म्हणून शपथ घेतली तेव्हा पासुन मी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कोरोना काळात रुग्णालयात लोकात जाऊन विचारपूस करुन सर्व काळजी घेतली. ओमराजे हा उमेदवार नसुन घरातील सदस्य आहे, नाते आहे ते मी गेली 5 वर्ष जपले असे ओमराजे म्हणाले.केंद्रात व राज्यात सरकार भाजप आहे त्यामुळे ओबीसी व मराठा आरक्षण वाद लावू नका, राजकीय स्वार्थासाठी लोकांचे लक्ष्य भटकवू नका. लोकांना आशा आहे त्यामुळे आरक्षण द्या, वाद लावू नका असे आवाहन ओमराजे म्हणाले.
धाराशिव येथे शिवसेना संघटन कार्यशाळा संपन्न झाली यावेळी संपर्कप्रमुख शंकर बोरकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर, विजय सस्ते, शाम जाधव, तालुका प्रमुख सतीश सोमाणी, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे, युवती सेना जिल्हाध्यक्ष मनीषा वाघमारे, बाळासाहेब काकडे, विजय सस्ते यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
सोयाबीन भाव 10 वर्षापुर्वी काय होता त्या पटीत भाव वाढले का ? दुधाला 5 रुपये अनुदान दिले मात्र ते फसवे असुन धाराशिव जिल्ह्यात एकही सहकारी दूध संघ नाही. तलाठी भरतीमध्ये गृहमंत्री पुरावे मागत आहेत हे उलटे सुरु आहे, विद्यार्थी यांनी अभ्यास करायचा की पुरावे जमा करायचे. भावनिक मुद्दे करुन भाजप व सहकारी 14 पक्षाचा लोकांना मुळ मुद्यापासून भटकवायचं सुरु आहे. 5 हजार कोटी आणले म्हणून सत्कार करुन घेतले मात्र आता त्यांनी 5 हजार कोटींची कामे दाखवा असे आव्हान आमदार कैलास पाटील यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना जाहीर भाषणात दिले.
स्टेजवर जारी सगळे एकत्र असले तरी ते उमेदवार देऊ शकले नाहीत त्यांच्याकडे उमेदवार नाही, इतर लोक फोडायचे प्रयत्न आहे. मोदी नसताना ही धाराशिव येथे शिवसेनेचा खासदार होता हे भाजप विसरले आहे. भाजप विरोधात रोष असुन त्यांना दाखवून देऊ असे आमदार पाटील म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालय प्रश्न, औषध व रक्ताचा तुटवडा आहे, लोकांची सहनभूती आहे ती मतात रूपांतरन करा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
जेव्हा समाजाला भाकरीची गरज असते तेव्हा राजकीय लोक नागरिकांना धर्माची नशा पाजवतात अशी टीका संपर्कप्रमुख शंकर बोरकर यांनी केली.
सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर म्हणाले की, गेल्या काही दिवसात जिल्ह्यात उद्घाटने झालेल्या आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप केला. जिल्ह्यात जी आरोग्य शिबिरे घेतली त्यात दिली गेलेली औषधे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातून घेतली गेली मात्र शिबिरासाठी औषधाची वेगळी तरतूद न केली गेल्याने औषधांचा तुटवडा होऊन रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला असे नंदूराजे म्हणाले.