तुळजापुर – समय सारथी, नंदकिशोर नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शांकभरी नवरात्र उत्सवला घटस्थापनेने सुरुवात झाली असुन तुळजाभवानी देवीची मुळ अष्टभुजा मुर्ती पलंगावरून सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. देवीचा हा धाकटा दसरा नवरात्र उत्सव म्ह्णून ओळखला जातो त्यामुळे राज्यभरातून भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 25 जानेवारी पर्यंत हा उत्सव चालणार असुन विविध अलंकार पुजा, धार्मिक पुजा, जल यात्रा व विधी होणार आहेत. मानकरी यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली यावेळी महंत, पुजारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत होते.
नवरात्र काळात रथ, मुरली, भवानी तलवार, शेषशाही, महिषसूर मर्दीनी असे विविध अलंकार पुजा, जलयात्रा होणार आहे. तुळजाभवानी देवीचे वर्षातून शारदीय व शाकंभरी असे 2 नवरात्र उत्सव होतात.