धाराशिव – समय सारथी
भाजप धाराशिव येथे उमेदवार द्यायला घाबरत आहे,भीती नसती तर आतापर्यंत उमेदवार कामाला लागला असता, तुमचा पैलवान तरी मैदानात उतरवा असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर भाजप व त्यांच्या घटक पक्षांना खुले आव्हान दिले आहे.
भाजपला त्यांचा उमेदवार जाहीर करायला इतका वेळ का लागतो, याचा विचार भाजपने व त्यांच्या घटक पक्षाने करावा. मी कायम सांगत असतो तुमचा पैलवान कोण आहे ते तरी जाहीर करुन मैदानात उतरवा, जनता ठरवेल ना ? जनतेला निर्णय घेऊ द्या ? माझं काम योग्य वाटत असेल तर मला निवडून देतील नाहीतर पाडतील असे ओमराजे म्हणाले. यावेळी आमदार कैलास पाटील उपस्थितीत होते.
कोण कश्या पद्धतीने बोलत आहे त्यापेक्षा जनतेतून निवडून येत असताना जनतेचे मत महत्वाचे आहे, जनता ठरवत असते कोणाला निवडून आणायचे. कोणाचे काम योग्य अयोग्य हे जनता ठरवते. घोडा मैदान लांब नाही, महाविकास आघाडीच एकमत झाले व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला परत लढण्याची संधी दिली व आदेश दिला तर मी निवडणुक लढेल असे सांगत ओमराजे यांनी आपण लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. माझ्या कामाचे अवलोकन करुन जनता निर्णय घेईल की मला निवडून द्यायचे का नाही ते ? मला आजी किंवा माजी करायचे हा अधिकार जनतेला आहे आणि तो आपण त्यांच्याकडे ठेवावा असे ओमराजे यांनी सांगितले.
महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी ओमराजे यांचा उल्लेख माजी खासदार असा केला होता त्याला ओमराजे यांनी उत्तर दिले.
मी इतका अकार्यक्षम असेल व लोकात तीव्र नाराजी असेल व मला माजी खासदार करण्याची भाषा होत असेल, लोकमतात इतके शून्य स्थान असेल तर भाजपला त्यांचा उमेदवार जाहीर करायला इतका वेळ का लागतो, याचा विचार भाजपने व त्यांच्या घटक पक्षाने करावा. मी कायम सांगत असतो तुमचा पैलवान कोण आहे ते तरी जाहीर करुन मैदानात उतरवा, जनता ठरवेल ना ? जनतेला निर्णय घेऊ द्या ? माझं काम योग्य वाटत असेल तर मला निवडून देतील नाहीतर पाडतील. भाजपला भीती नसती तर आतापर्यंत उमेदवार कामाला लागला असता असे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी सांगितले.