धाराशिव – समय सारथी
सकल ओबीसी समाजाच्या वतीने धाराशिव येथे 24 जानेवारीला ओबीसी समाजाचा महायल्गार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब आंबेडकर, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण गायकवाड, प्रकाश शेंडगे, टी पी मुंडे यासह इतर 20 प्रमुख नेते उपस्थितीत राहतील. वंचित बहुजन आघाडीने यासाठी पाठिंबा दिला आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाला संविधानिक दर्जा नसल्या कारणाने अनेक महत्वाचे आरक्षणापासुन ओबीसी समाज वंचित आहे. मंडल आयोगाची संपूर्णपणे अंमलबजावणी झाली नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे.400 पेक्षा अधिक जातींचा ओबीसीमध्ये समावेश आहे. 127 ची घटना दुरुस्ती झाली नसल्याचे दर्शवून स्थानिक स्वराज संस्था मधुन ओबीसी आरक्षण हद्दपार करण्याचा प्रयोग राज्य सरकारने करुन पाहिलेला आहे, ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला.
नियोजनात ढिसाळपणा असल्याने 17 तारखेचा मेळावा पुढे ढककला असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अर्जुन सलगर, ऍड खंडेराव चौरे, सचिन शेंडगे, पोपट माळी, अरुण जाधवर, कल्याण कुंभार, बालाजी वगरे यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.